Back

ⓘ प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते ..                                               

नवयुग

नवयुग पी के अत्रे साप्ताहिक प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनमानसात सामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी नवयुग हे सुरू केली 140 ते 1960 च्या दशकात लावलेले एक साप्ताहिक होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत या वृत्तपत्राने चळवळीच्या बाजूने मुखपत्र प्रमाणे जबाबदारी निभावली १इतिहास अंकप्रकार साप्ताहिक वृत्तपत्र मालक प्रल्हाद केशव अत्रे प्रकाशक प्रल्हाद केशव अत्रे मुख्य संपादक प्रल्हाद केशव अत्रे स्थापना 19 जानेवारी 1940 प्रकाशन बंद 8 जुलै 1962 भाषा मराठी मुख्यालय पुणे महाराष्ट्र 1940 पर्यंत मुंबई महाराष्ट्र 140 पासून संदर्भ मराठी वृत्तपत्राचा इतिहास

                                               

ब्रह्मचारी (मराठी चित्रपट)

ब्रह्मचारी हा एक इ.स. १९३८ मधील मराठी भाषेतील कृष्ण धवल चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मास्टर विनायक यांनी केले होते आणि प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिले होते. या चित्रपटात मीनाक्षी शिरोडकर यांच्यासह मुख्य भूमिकेत स्वतः मास्टर विनायक यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू राष्ट्रवादी संघटनेवर निशाणा साधणारा राजकीय उपहास होता. हा चित्रपट हिंदी भाषेतही बनला होता. इ.स. १९३७ मधील मराठी चित्रपट धर्मवीर नंतर अत्रे यांचा मास्टर विनायक बरोबरचा हा दुसरा चित्रपट होता. विनोदी संवाद आणि उपहासात्मक थीम व्यतिरिक्त हा चित्रपट मीनाक्षी शिरोडकरांच्या स्विमूट सूट प ...

                                     

ⓘ प्रल्हाद केशव अत्रे

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. त्यांचे ठाकरे यांच्याशी असलेले वादही फार चर्चेत होते.

                                     

1. जन्म व बालपण

प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द /सासवड या गावात जन्मले.त्यांचा जन्म १३ ऑंगस्ट १८९८ रोजी झाला.

                                     

2. कारकीर्द

पत्रकारिता

इ.स. १९२३ साली अत्र्यांनी अध्यापन मासिक सुरू केले. इ.स. १९२६ मध्ये रत्‍नाकर व इ.स. १९२९ साली मनोरमा, आणि पुढे इ.स. १९३५ साली नवे अध्यापन व इ.स. १९३९ साली इलाखा शिक्षक ही मासिके काढली. जानेवारी १९, इ.स. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, इ.स. १९६२ पर्यंत ते चालू होते. जून २, इ.स. १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. २१ जानेवारी १९४० ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरु केले. त्यावेळी अत्रे कॉंग्रेसमध्ये होते. त्यामुळे कॉंग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती.

                                     

3. संस्था

आचार्य अत्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांतली काही या:-

 • आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुरंदर पुणे जिल्हा
 • आचार्य अत्रे नाट्यगृह, पिंपरी पुणे
 • आचार्य अत्रे कन्या कॉलेज, पुरंदर पुणे जिल्हा
 • आचार्य अत्रे यांचा भव्य पुतळा, वरळी मुंबई पुतळ्याची उंची ३४ फूट
 • आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई. स्मारकाची सर्व नियोजित कामे पूर्ण झाल्याने फेब्रुवारी २०१२ मध्ये ही समिती बरखास्त करण्यात आली.
 • आचार्य अत्रे वार्षिक साहित्य संमेलन, सासवड
 • आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे
 • आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ, ठाणे
 • आचार्य अत्रे यांचा पुतळा, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड पुणे जिल्हा. हाच चार फूट उंचीचा पुतळा पूर्वी मुंबईत वरळी येथे होता.
 • सासवड नगरपालिकेने बांधलेले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड पुणे जिल्हा
 • आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड पुरंदर तालुका-पुणे जिल्हा
 • आचार्य अत्रे कट्टा, कांदिवलीपश्चिम, मुंबई
 • आचार्य अत्रे सभागृह, पुणे उद्‌घाटन २९ मार्च १९८१
 • आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी पुणे
 • आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे ४११०१६

पहा: प्रतिष्ठाने                                     

3.1. संस्था चित्रपट

इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. हंस पिक्स्चर्ससाठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या पिलर ऑफ द सोसायटी या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व बेगुनाह ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली हंस साठीच ब्रह्मचारी चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला ब्रॅंडीची बाटली हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने नवयुग चित्रपट कंपनी काढली. पुढे हंस पिक्चर्स मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे लपंडाव चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. लपंडाव चित्रपटानंतर त्यांनी संत सखू या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु प्रभातने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची अमृत ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले. अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.

                                     

4. अध्यापन

मुंबईत पहिले सहा महिने सॅंढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल भरडा न्यू हायस्कूल मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यावेळी त्यांना फक्त ३५ रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला.

जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी. टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.

                                     

5. उणिवा आणि निष्ठा

आदर्शांची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्यहनन, माहितीची शहानिशा करून घेता प्रहार करणे, अशा अत्र्यांच्या काही उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी त्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला.

                                     

6.1. पुस्तके शाळांसाठी क्रमिक पुस्तके

आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि शंकर केशव कानेटकर कवी गिरीश यांनी संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते इंग्रजी पाचवी हल्लीची पाचवी ते नववी च्या अभ्यासक्रमांत होती, सन १९३४ साली निघालेल्या या क्रमिक पुस्तकांसारखी सुरेख पुस्तके त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही निघाली नाहीत, असे शिक्षकांचे आणि पालकांचे मत आहे. ही पुस्तके पहायला मिळणेही अशक्यप्राय झाल्याने, डिंपल प्रकाशनाने या पुस्तकांची नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती आचार्य अत्रे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त १३ ऑगस्ट २०१७ रोजी बाजारात आणली आहे. आचार्य अत्रे यांचे नवयुग मराठा साप्ताहिकाचा पहिला अंक १९४० २१ जानेवारी रोजी प्रकाशित झाला.

आचार्य अत्रे आणि गिरीश दोघेही हाडाचे द्रष्टे शिक्षक होते. त्यावेळी ते अनुक्रमे कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे मराठीचे अध्यापक होते. अत्रे तर लंडनहून शिक्षणशास्त्रातील उच्च पदविका घेऊन परतले होते; आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा अशा जाणकारांच्या अनुभवातून ही पुस्तके तयार झाली आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अवघ्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शकाचे काम करू लागली. २०१७ सालीही या पुस्तकांतील कल्पना कालसुसंगत असल्याचे जाणवते. पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषा-शिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली आहेत. पुस्तकांची रचना Design करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला आहे. पुस्तके मनोरंजक करण्याच्या प्रयत्नात फार सोपी होतात आणि शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतात. ‘मनोरंजकत्व म्हणजे सुलभत्व नव्हे!’ गद्य-पद्य लेखनातील विविध फुलोरे, छटा आणि तऱ्हा यांचा मनोज्ञ संगम या पुस्तकांत अनुभवायला मिळेल. सारांश, राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि मानवी अशा तिहेरी दृष्टीने या पुस्तकांची केलेली रचना जाणकारांना प्रतीत होईल.’                                     

6.2. पुस्तके नाटके

 • प्रीतिसंगम नाटक
 • साष्टांग नमस्कार
 • सम्राट सिंह
 • पाणिग्रहण
 • शिवसमर्थ
 • पराचा कावळा
 • ब्रम्हचारी
 • भ्रमाचा भोपळा
 • मी मंत्री झालो
 • मी उभा आहे
 • प्रल्हादनाटक
 • मोरूची मावशी
 • कवडीचुंबक
 • वीरवचन
 • अशी बायको हवी
 • डॉक्टर लागू
 • एकच प्याला-विडंबन
 • घराबाहेर
 • लग्नाची बेडी
 • गुरुदक्षिणा
 • वंदे भारतम
 • तो मी नव्हेच
 • उद्याचा संसार
 • जग काय म्हणेल?
 • बुवा तेथे बाया
                                     

6.3. पुस्तके कथासंग्रह

 • अशा गोष्टी अशा गंमती
 • बत्ताशी आणि इतर कथा
 • फुले आणि मुले
 • कशी आहे गम्मत
 • कावळ्यांची शाळा
                                     

6.4. पुस्तके इतर

 • आषाढस्य प्रथम दिवसे
 • सूर्यास्त
 • हास्यकट्टा
 • मी अत्रे बोलतोय
 • मुद्दे आणि गुद्दे
 • केल्याने देशाटन
 • क्रांतिकारकांचे कुलपुरुष
 • विनोबा
 • हार आणि प्रहार
 • सुभाष कथा
 • अत्रेप्रहार
 • जय हिंद जय महाराष्ट्र
 • चित्रकथा भाग-२
 • हंशा आणि टाळ्या
 • मराठी माणसे, मराठी मने
 • हुंदके
 • चित्रकथा भाग-१
 • महापूर
 • संत आणि साहित्य
 • दलितांचे बाबा
 • महाराष्ट्र कालचा आणि आजचा
 • वस्त्रहरण
 • अप्रकाशित आचार्य अत्रे संपादक: डॉ. नागेश कांबळे
 • अध्यापक अत्रे
 • आमदार आचार्य अत्रे
 • समाधीवरील अश्रू
 • विनोद गाथा
 • मी कसा झालो?
 • दूर्वा आणि फुले
 • इतका लहान एवढा महान
 • अत्रेटोला
 • अत्रेवेद
 • झालाच पाहिजे
 • सिंहगर्जना
                                     

7. न लिहिलेली पुस्तके

आचार्य अत्रे हे महाकवी कालिदास’ आणि ‘गानअवलिया तानसेन’ अशी दोन नाटके बालगंधर्वांसाठी लिहिणार होते. ते ‘संत नामदेव’, ‘संत जनाबाई’ ही नाटके छोटा गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांच्यासाठी आणि ‘शाहीर सगनभाऊ तुकाराम शिदे व मेघमाला संजीवनी बीडकरसाठी लिहिणार होते. दत्ता भट यांच्यासाठी ते ‘महात्मा फुले’ हे नाटक लिहिणार होते. चार्वाक या प्राचीन काळातल्या प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून उठलेल्या एका तत्त्ववेत्त्यावरही त्यांना नाटक लिहायचे होतं. त्यासाठी त्यांनी माहिती गोळा करायलाही सुरुवात केली होती. अत्र्यांनी ‘तुकाराम’ नाटकही लिहायचे ठरवले होते. आचार्य अत्र्यांनी वासुदेव चंद्रचूड यांच्यासाठी ‘पुंडलिक’ ठरवला होता;. ‘शिवसमर्थ’ नाटकाचा तर एकदीड अंकही त्यांनी लिहिला होता.

                                     

8. पुरस्कार आणि सन्मान

 • आचार्य अत्रे यांच्या संपूर्ण पुस्तकांचा दांडगा अभ्यास असलेले दिलीप देशपांडे हे आचार्य अत्रे यांच्यावर बेतलेला ‘अष्टपैलू अत्रे’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतात.
 • दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिनी म्हणजे १३ ऑगस्ट रोजी सासवड येथे आचार्य अत्रे साहित्य संमेलन भरते. अनेक कार्यक्रमांसोबत त्या संमेलनात अत्र्यांच्या नावाचे काही पुरस्कार दिले जातात.
 • अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन असलेला ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम आहे.
 • ’मी अत्रे बोलतोय’ हा एकपात्री कार्यक्रम करणारे अनेकजण आहेत. सदानंद जोशी हे त्यांपैकी एक प्रमुख. डॉ.अनंत एस. परांजपे हेदेखील ’मी अत्रे बोलतोय’ करतात.
 • आचार्य अत्रे यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने आचार्य अत्रे प्रतिष्ठान पुणे यासारख्या अनेक संस्था आचार्य अत्रे पुरस्कार देतात.
 • विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. आचार्य अत्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.


                                     

9. आचार्य अत्र्यांसंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

 • आचार्य अत्रे जेव्हा विद्यार्थी होते - शिरीष पै
 • युगप्रवर्तक चित्रपट कथाकार आचार्य अत्रे शशिकांत श्रीखंडे
 • खुमासदार अत्रे प्रा. श्याम भुर्के
 • अत्र्यांचं अंतरंग सुधाकर वढावकर
 • थोर नाटककार आचार्य अत्रे आनंद जयराम बोडस
 • अध्यापक अत्रे प्र. के. अत्रे
 • आचार्य अत्र्यांचे महान समकालीन डॉ. सुधीर मोंडकर
 • आठवणीतले अत्रे - अप्पा परचुरे
                                     

10. अत्रे वाङ्‌मय प्रदर्शन

पुण्यातील सुहास बोकील हे आचार्य अत्रे यांच्या वाङ्‌मयाचे संग्राहक आहेत. ते अत्रे वाङ्‌मयाचे प्रदर्शन भरवीत असतात. फेब्रुवारी २०१६ पर्यंत बोकील यांनी अशी ४२ प्रदर्शने भरवली आहेत. प्रदर्शनात अत्र्यांची पुस्तके, वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणे, कागदपत्रे, अत्र्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, ऑडिओ-व्हीडिओ आदींचा समावेश असतो.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →