Back

ⓘ जगामधील बौद्ध धर्म. बौद्ध धर्म बौद्ध धम्म हा जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक तसेच वर्तमान जगातील सर्वात प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. बौद्ध धर्माची इ.स.पू. ६ व ..



जगामधील बौद्ध धर्म
                                     

ⓘ जगामधील बौद्ध धर्म

बौद्ध धर्म बौद्ध धम्म हा जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक तसेच वर्तमान जगातील सर्वात प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. बौद्ध धर्माची इ.स.पू. ६ व्या शतकामध्ये उत्तर भारतात झालेली आहे. आज लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील चौथा सर्वात मोठा धर्म आहे. एका अनुमानानुसार, जागतिक लोकसंख्येत २८.८% म्हणजे २.१ अब्ज लोक बौद्ध धर्मीय आहेत. तथापि, काही सर्वेक्षणात बौद्धांची लोकसंख्या अवघी ५२ कोटी ७% सुद्धा सांगण्यात येते. बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी व बौद्ध अनुयायांचे गुरू तथागत गौतम बुद्ध आहेत 1 नंबर ला-ख्रिश्चन दोन नंबर ला मुस्लिम 3 नंबर ला कोणताही धर्म न मानणारे व चौथा हिंदू व 5 वा सर्वात मोठा धर्म बौद्ध आहे

.

                                     

1. लोकसंख्या

बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या ही वेगवेगळ्या सर्वेक्षणात वेगवेगळी सांगण्यात आलेली आहे. एका सर्वेक्षणानूसार इ.स. २००७ मध्ये जगामध्ये बौद्ध लोकसंख्या कमाल १.९२ अब्ज २८.८% होती. इ.स. २०१६ मध्ये हिच २८.८% लोकसंख्या २.२ अब्ज झालेली आढळते. धार्मिक लोकसंख्येच्या दृष्टिने बौद्ध धर्म हा इस्लाम व हिंदू धर्माहून मोठा तर ख्रिश्चन धर्माच्या खालोखाल असणारा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.

दुसऱ्या एका बौद्ध सर्वेक्षणानूसार, इ.स. २०१० मध्ये जगातील बौद्धांची लोकसंख्या १.६ अब्ज होती आणि ही संख्या जागतिक लोकसंख्येत २३% आहे. या सर्वेक्षणात सुद्धा बौद्ध धर्माला जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे म्हटले गेले आहे.

अन्य एका सर्वेक्षणानूसार, बौद्ध धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगण्यात आले आहे. यात बौद्धांची लोकसंख्या ही जवळजवळ १.२ अब्ज सांगितली आहे. बौद्ध धर्माची सुरूवात ख्रिश्चन व इस्लाम धर्मांच्या उदयापूर्वी झाली आणि या दोन धर्मानंतर तो जगातील तिसरा मोठा धर्म असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. या सर्वेक्षणानूसार लोकसंख्येत बौद्ध धर्म हा हिंदू धर्मापेक्षा मोठा असल्याचे सांगितले गेले आहे.

इतर काही सर्वेक्षणांत बौद्धांची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजेच ४८ कोटी ते ५२ कोटी जगाच्या लोकसंख्येच्या ७% - ९% दरम्यान सांगितली असून आणि बौद्ध धर्म हा ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू या तीन धर्मांनंतर जगातला चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म असल्याचे नमूद केले गेले.

                                     

2. इतिहास

आशिया खंडात आज बौद्ध धर्म मुख्य धर्म आहे. चित्रातील गडद पिवळा रंग असणाऱ्या सर्व क्षेत्रांत बौद्ध धर्मीय बहुसंख्यक आहेत. इ.स.पूर्व ६व्या शतकात भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला आणि पुढिल काही शतकांत तो जगात पसरला तर आशियात प्रमुख धर्म बनून राहिला. या धर्माचा सर्वाधिक प्रचार व प्रसार बौद्ध भिक्खू, बौद्ध प्रचारक आणि बौद्ध सम्राटांच्या माध्यमातून विश्वात दूर दूर पर्यंत झाला. सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता आणि तेव्हा मौर्य साम्राज्यातील सुमारे ७५% प्रजा ही बौद्ध धर्मीय बनलेली होती.

                                     

3. संप्रदाय

बौद्ध धर्माचे हजारों संप्रदाय अस्तित्वात होते, आज त्यातील बरेच नष्ट झाले तसेच कमी-अधिक प्रमाणात हजारों आजही अस्तित्वात आहेत. एकट्या जपान मध्ये ७८१ पेक्षा अधिक बौद्ध संप्रदाय आहेत. महायान, हीनयान थेरवाद, वज्रयान व नवयान हे बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय आहेत. शिंटो, ताओ, झेन इत्यादींना सुद्धा बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जाते.

                                     

3.1. संप्रदाय महायान

महायान पूर्वीय बौद्ध धर्म हा लोकसंख्येत बौद्ध धर्माचा सर्वात मोठा संप्रदाय आहे. महायान व्यापक रूपात संपूर्ण पूर्व आशियात प्रसिद्ध आहे, जगातील एकूण बौद्धांपैकी जवळजवळ ७०% बौद्ध लोकसंख्या ही महायानी बौद्धांची आहे. चीन, हॉंग कॉंग, जपान, दक्षिण कोरीया, उत्तर कोरीया, तैवान, मकाउ आणि व्हिएतनाम या देशांत महायान बौद्ध धर्म हा बहुसंख्यक आहे

                                     

3.2. संप्रदाय थेरवाद

बौद्ध धर्माचा दूसरा सर्वात मोठा संप्रदाय हा थेरवाद दक्षिणी बौद्ध धर्म आहे, आणि हा संप्रदाय मुख्यत आग्नेय आशियात सर्वाधिक प्रसिद्ध वा बहुसंख्यक आहे. थेरवाद बौद्ध धर्म हा कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड, क्रिसमस द्वीप, सिंगापुर, श्रीलंका या देशांत बहुसंख्यक आहे तर मलेशिया, ब्रुनेई, तिमोर, इंडोनेशिया, फिलीपिन्स या देशांत सुद्धा थेरवादी मोठ्या संख्येने आहे.

                                     

3.3. संप्रदाय वज्रयान

वज्रयान उत्तरी बौद्ध धर्म हा बौद्ध धर्माचा तिसरा लहान संप्रदाय आहे, वज्रयानला महायान संप्रदायाचा उपसंप्रदाय सुद्धा मानले जाते. वज्रयानी बौद्ध अनुयायी हे तिबेट, भूतान, मंगोलिया या देशांत तसेच हिमालयीन क्षेत्र व रशियातील काही प्रदेशांत बहुसंख्यक आहेत. हा संप्रदाय जगभरात प्रसारीत केला गेलेला आहे. जागतिक बौद्ध धर्म गुरू १४ वे दलाई लामा या संप्रदायातील आहेत.

                                     

3.4. संप्रदाय नवयान

नवयान हा भारतातील मुख्य व नवा बौद्ध संप्रदाय आहे. याला ‘नवबौद्ध धर्म’ किंवा ‘भीमयान’ असेही म्हटले जाते. २० व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा शुद्ध व विज्ञाननिष्ठ संप्रदाय स्थापन केलेला आहे. ५ लक्ष अनुयायांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नवयान बौद्ध स्वाकारला व येथूनच या संप्रदायाची सुरूवात झाली. याचा मुख्य उद्देश हिंदू धर्मातील जातियता नष्ट करने तसेच शोषितांना व हिंदू दलितांना त्यांचे मानवी हक्क प्रदान करने हा होता. आणि हा संप्रदाय नवबौद्धांचा पूर्वाश्रमीचे हिंदू दलित दलितांचा उत्कर्ष - विकास करण्यात यशस्वी ठरला. २०११ च्या भारतीय जनगणेनुसार भारतातील ८५ लाख या अधिकृत व एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% लोकसंख्या ही नवयानी नवबौद्धांची आहे, आणि १३% बौद्ध हे हिमालयीन राज्यातील पारंपारिक बौद्ध आहेत. भारतातील एकूण नवयानी बौद्धांपैकी सुमारे ९०% महाराष्ट्र राज्यात आहेत.

                                     

4. सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे देश

संपूर्ण विश्वात जवळजवळ १.८ अब्ज से २.२ अब्ज १८० कोटी - २२० कोटी बौद्ध अनुयायी आहेत. यातील जवळवळ ७०% ते ७५% महायानी बौद्ध तर बाकी २५% ते ३०% थेरावादी, नवयानी भारतीय आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान आणि थेरवाद हीनयान, नवयान, वज्रयान याशिवाय बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय वा उपवर्ग सुद्धा आहेत परंतु यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात अधिक बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियातील सर्वच देशांत बहूसंख्यक म्हणून राहत आहेत. दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्यक आहे. आशिया खंडाची अर्ध्याहून अधिन लोकसंख्या बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि युरोप सारख्या खंडांत सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समूदाय राहतात. जगात १८ हून अधिक असे देश आहेत जिथे बौद्ध धर्म हा बहुसंख्यक धर्म आहे. जगात काही देश असेही आहेत की, जिथल्या बौद्ध लोकसंख्येबाबत कोणतीही विश्वासनीय माहिती उपलब्ध नाही.

                                     

5. बौद्ध बहुसंख्यक देश

जगातील बौद्ध राष्ट्र आणि त्यातील बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण वा टक्केवारी

बहूसंख्यक बौद्ध देश

आज जगात २० हून अधिक देशांत प्रजासत्ताक राज्यांसमवेत बौद्ध धर्म हा बहूसंख्यक अथवा प्रमुख धर्म आहे.

अधिकृत बौद्ध देश

जगात लाओस, कंबोडिया, भूतान, थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका हे ६ देश ‘अधिकृत’" बौद्ध देश” आहेत, कारण या देशांतील संविधानांत बौद्ध धर्माला ‘राजधर्म’ किंवा ‘राष्ट्रधर्म’ दर्जा प्राप्त आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →