Back

ⓘ टाटा उद्योगसमूह हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मुंबईत मुख्यालय असलेला भारतीय उद्योगसमूह आहे. हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योगसमूहांपैकी एक आहे. बाजार भांडवल ..टाटा उद्योगसमूह
                                     

ⓘ टाटा उद्योगसमूह

टाटा उद्योगसमूह हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मुंबईत मुख्यालय असलेला भारतीय उद्योगसमूह आहे. हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योगसमूहांपैकी एक आहे. बाजार भांडवल आणि महसुलाचा विचार करता भारतातील हा आघाडीचा समूह आहे. रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या क्षेत्रांत या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत. सहा खंडांतील ८०हून अधिक देशांत टाटा समूहाचे कामकाज विस्तारले आहे.

                                     

1. उद्योगसमूहाचा इतिहास

टाटा समूहाची सुरुवात १८६८ मध्ये झाली. भारतावर ब्रिटिश राजवट असताना जमशेटजी नसरवानजी टाटा यांनी हिंदुस्थानात कापसाचे व्यवहार करणारी कंपनी स्थापन केली. त्यानंतर नागपूरमध्ये १८७७ मध्ये एम्प्रेस मिल्स स्थापन झाली. टाटा समूहाने मुंबईत १९०३ मध्ये ताजमहाल हॉटेल सुरू केले. १९०४ मध्ये जमशेटजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र दोराबजी टाटा समूहाचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली समुहाने पोलादनिर्मिती आणि जल विद्युतनिर्मिती प्रकल्प सुरू केले. सर दोराबजी टाटा यांच्या मृत्यूनंतर १९३४ मध्ये नवरोजी सकलातवाला यांनी पुढची सुमारे चार वर्षे समूहाची धुरा वाहिली. १९३८ मध्ये जहांगीर रतनजी दादाभाई अर्थात जे.आर.डी. टाटा हे या समूहाचे चेअरमन झाले. त्यांनी समूहाचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. टाटा केमिकल्स, टेल्को आता टाटा मोटर्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा टी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टायटन इंडस्ट्रीज ही या काळात सुरू झालेल्या काही महत्त्वाच्या कंपन्यांची नावे होत. रतन टाटा यांनी जेआरडींकडून १९९१ मध्ये सूत्रे स्वीकारली. सायरस पालनजी मिस्त्री हे टाटा उद्योग समूहाचे नवे अध्यक्ष आहेत. २०१२ साली त्यांनी रतन टाटा यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.२०१६ मध्ये सायरस मिस्त्री टाटा समूहातून बाहेर पडले.

                                     

2. टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षांची सूची

 • रतन टाटा १९९१-२०१२
 • जमशेदजी टाटा १८८७-१९०४
 • नवरोजी सकलातवाला १९३२-१९३८
 • जे. आर. डी. टाटा १९३८-१९९१
 • सायरस मिस्त्री २०१२-२०१६
 • रतन टाटा २०१६-२०१७
 • सर दोराबजीटाटा १९०४-१९३२
                                     

3. टाटा उद्योगसमूहाचे लोकोपकारी कार्य

टाटा उद्योगसमूहाने विविध संशोधन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या उभारणीमध्ये आर्थिक योगदान दिले आहे. उद्योग समूहाच्या लोकोपकारी कार्याची दाखल घेऊन २००७ साली समूहाला कार्नेज पदकाने गौरविण्यात आले. टाटा उद्योग समूहाने स्थापन केलेल्या काही संस्थांची सूची:-

 • भारतीय विज्ञान संस्था
 • टाटा फुटबॉल अकादमी
 • टाटा क्रिकेट अकादमी
 • टाटा मूलभूत संशोधन संस्था
 • टाटा व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र
 • टाटा मेमोरिअल हॉस्पिटल
                                     

4. टाटा समूहाचा इतिहास सांगणारी पुस्तके

 • कॉर्पोरेट आयडाॅल रतन टाटा सुधीर सेवेकर
 • जमशेदजी टाटा
 • जमशेटजी टाटा सुभाषचंद्र जाधव
 • टाटायन - एक पोलादी उद्यमगाथा लेखक: गिरीश कुबेर
 • टाटा एका कॉर्पोरेट ब्रॅंडची उत्क्रांती
 • द टीसीएस स्टोरी.ॲन्ड बियॉंड
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →