Back

ⓘ भारत इतिहास संशोधक मंडळाची विश्वनाथ काशीनाथ राजवाडे आणि सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुण्यातील अप्पा बळवंत चौकात असलेल्या सरदार मेहेंदळे यांच्या वाड्यात ..भारत इतिहास संशोधक मंडळ
                                     

ⓘ भारत इतिहास संशोधक मंडळ

भारत इतिहास संशोधक मंडळाची विश्वनाथ काशीनाथ राजवाडे आणि सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुण्यातील अप्पा बळवंत चौकात असलेल्या सरदार मेहेंदळे यांच्या वाड्यात केली. पुढे ही संस्था पुण्याच्या सदाशिव पेठ परिसरातील स्वतःच्या इमारतीत स्थलांतरित झाली.

त्यानंतरही पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ इतिहास संशोधकांना मदत करण्यासाठी आणि ऐतिहासिक अभ्यासाच्या प्रगतीस हातभार लावण्याच्या उद्देशाने पुढे चालूच राहिले. जनतेने मंडळाला दानादाखल पुस्तके आणि कागदपत्रे मिळवून देऊन खूप समर्थन दिले. राजवाडे यांचे शिष्य दत्तो वामन पोतदार, गणेश हरि खरे आणि वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी मंडळाच्या कामात स्वतःला झोकून देऊन मंडळाला समृद्ध करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

                                     

1. संसाधने

भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये २०१९ साली १५ लाखांहून अधिक ऐतिहासिक कागदपत्रे आणि मराठी देवनागरी आणि मोडी, फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजी भाषेतली ३०,००० हस्तलिखिते आहेत. मंडळाच्या सुसज्ज संग्रहालयात चार हजाराहून अधिक जुनी नाणी एक हजार रंगीत चित्रे आणि काही शिल्पे व शिलालेख जतन करून ठेवली आहेत. मंडळाच्या ग्रंथालयातील २७,०००हून अधिक इंग्रजी-मराठी पुस्तके संशोधकांना तेथेच विनामूल्य वाचनासाठी किंवा घरी नेऊन वाचण्यासठी नाममात्र फीमध्ये उपलब्ध होऊ शकतात. ही संसाधने प्रामुख्याने मराठा साम्राज्य, मराठा संस्कृती आणि मराठी इतिहासावरची आहेत.भारतावरील मुगल आणि ब्रिटिश साम्राज्यावरील साहित्याचा मोठा संग्रहही त्यांत आहे.

भारत इतिहास संशोधक मंडळाकडून एक त्रैमासिक नियतकालिकाही प्रकाशित केले जाते. या नियतकालिकात नवीन शोधांवरील निबंध आणि लेख सादर केले जातात. मंडळाने अनुभवी इतिहासकारांच्या वार्षिक परिषदांच्या आणि इतिहासकारांच्या अन्या बैठकीच्या अहवालांद्वारे लिहिलेली आणि संपादित केलेली पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. हे मंडळ वेळोवेळी तरुण संशोधकांसाढी आणि इतिहासकारांसाठी व्याख्याने, कार्यशाळा, प्रशिक्षण, सेमिनार आणि अभ्यासदौरा आयोजित करत असते.

                                     

2. मंडळाचे अध्यक्ष

 • १९४२ - १९५० - मालोजीराव नाईक निंबाळकर
 • १९१० - १९१३ - गणेश व्यंकटेश जोशी
 • ? - २०२० - श्री.मा.भावे
 • १९२६ - १९३५ - चिंतामण विनायक वैद्य
 • १९८८ - १९९१ - विश्वनाथ त्रिंबक शेटे
 • १९७४ - १९८१ - गणेश हरी खरे
 • १९१३ - १९२६ - काशिनाथ नारायण साने
 • १९३५ - १९४२ - नरसिंह चिंतामण केळकर
 • २०२० - प्रदीप रावत
 • १९८१ - १९८३ - हसमुख धीरजलाल सांकलिया
 • १९५० - १९७४ - दत्तो वामन पोतदार
 • १९८४ - १९८६ - रामचंद्र शंकर वाळिंबे
                                     

3. प्रकाशित ग्रंथ

 • शिवचरित्र वृत्त संग्रह, खंड १ ते ३
 • मठगावचा शिलालेख
 • सम्पूर्ण भूषण - रामचंद्र गोविंद काटे, १९३०
 • शिवचरित्र निबंधावली
 • मूर्तीविज्ञान
 • ऐतिहासिक फारसी साहित्य खंड १ ते ६
 • ऐतिहासिक पोवाडे खंड १ व २
 • शिवचरित्र साहित्य, खंड १ ते १६
 • शिवाजी निबंधावली
 • पुणे नगर संशोधन वृत्त
 • शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ ते ३
 • शिवभारत
 • शिवचरित्र प्रदीप
 • संभाजी कालीन पत्रसार संग्रह
 • दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने
                                     

4. मंडळाचे संशोधक

 • शोभना गोखले
 • शंकर नारायण जोशी
 • मा.वि.गुजर
 • वासुदेव सीताराम बेंद्रे
 • नारायण भवानराव पावगी
 • जनार्दन सखाराम करंदीकर
 • न.चिं.केळकर
 • गो.त्र्यं.कुलकर्णी
 • मा.रा.कंटक
 • द.बा.डिसकळकर
 • गणेश हरी खरे
 • अ.रा.कुलकर्णी
 • कमल गोखले
 • कृष्णाजी वासुदेव पुरंदरे
 • भास्कर रामचंद्र भालेराव
 • पां.मा.चांदोरकर
 • यादव माधव काळे
 • यशवंत राजाराम गुप्ते
 • दि.वि.काळे
 • स.ग. जोशी
 • मिया शिकंदरलाल आतार
 • गणेश सखाराम खरे
 • नारायण गोविंद चापेकर
 • बी.जी.परांजपे
 • पांडुरंग नरसिंह पटवर्धन
 • शंकर श्रीकृष्ण देव
 • गं.के.देशपांडे
 • चंद्रकांत अभंग
 • कृ.ना.चिटणीस
 • वि.सी.चितळे
 • गंगाधर नारायण मुजूमदार
 • रा.वि.ओतूरकर
 • शां.वि.आवळसकर
 • त्र्यंबक शंकर शेजवलकर
 • गजानन भास्कर मेहेंदळे
 • देवीसिंह व्यंकटसिंह चौहान
 • प्र.ल.सासवडकर
 • वा.कृ.भावे
 • ना.य.मिरीकर
 • सदाशिव मार्तंड गर्गे
 • य.न. केळकर
 • चिंतामण विनायक वैद्य
 • मोरेश्वर गंगाधर दिक्षित
 • गो.का. चांदोरकर
 • काशिनाथ नारायण साने
 • दत्तात्रेय विष्णु आपटे
 • कृ.वि.आचार्य
 • वि.का.राजवाडे
 • यशवंत खुशाल देशपांडे
 • स.म.दिवेकर
 • ब.द.आपटे
 • बाबासाहेब पुरंदरे
 • दत्तो वामन पोतदार
 • वासुदेवशास्त्री खरे
 • शिवराम महादेव परांजपे
 • विनायक लक्ष्मण भावे
 • चिंतामण गंगाधर भानू
 • चिंतामण गणेश कर्वे
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →