Back

ⓘ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचि स्थापना १९ नोव्हेंबर १९६०ला झाली. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कल ..                                     

ⓘ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचि स्थापना १९ नोव्हेंबर १९६०ला झाली. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ही संस्था उभारली. मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते.

                                     

1. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली पुस्तके

महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणार्‍या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या वतीने २०१५ सालापूर्वी प्रकाशित झालेली ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. मंडळाच्या या वेबसाइटवर ही पुस्तके उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासूनच्या अध्यक्षांची यादी क्रमानुसार अशी-तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, सुरेन्द्र बारलिंगे, यशवंत मनोहर, य. दि. फडके, विद्याधर गोखले, मधुकर आष्टीकर, द. मा. मिरासदार, सुरेश द्वादशीवार, रा. रं. बोराडे, रतनलाल सोनग्रा, मधु मंगेश कर्णिक, बाबा भांड

                                     

2. कोणती पुस्तके उपलब्ध?

या साईटवर सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने, लिओनार्दो दी विंचीपासून ते सुती वस्त्रोद्योग, मधुमेहपर्यंत अनेक विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेत अहिल्याबाई होळकर, महर्षी कर्वे, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, वसंतराव नाईक या सर्वांची चरित्रेही आहेत. भरताव्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय, स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र ते महाराष्ट्रातील कॉंग्रेसचा स्वातंत्र्यलढा अशी या पुस्तकांची रेंज आहे.

                                     

3. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या योजना

 • ललित व ललितेतर वाड्:मयाच्या प्रकाशनार्थ अनुदान योजना
 • महाराष्ट्राचे शिल्पकार चरित्रमाला योजना
 • नियतकालिकांना अनुदान योजना
 • अन्य मराठी साहित्य संमेलनांना अनुदान योजना
 • उत्कृष्ट ग्रंथांची भाषांतरे योजना
 • नवलेखक कार्यशाळा अनुदान योजना
 • पुस्तक प्रकाशन योजना - विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित करणे
 • नवलेखक पुस्तक प्रकाशनासाठी उत्तेजनार्थ अनुदान योजना
                                     

4. नेटवर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेली पुस्तकांची यादी

 • गजाआडच्या कविता
 • माहेरी गेली
 • सुब्बण्णा
 • धर्मकीर्तन
 • प्लॅस्टिकची मेजवानी
 • हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त
 • मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा
 • आर्थिक सिद्धान्त व अर्धविकसित प्रदेश
 • THE HIGH-CASTE HINDU WOMANPANDITA RAMABAI
 • चौदा पत्रे
 • महाराष्ट्राचे शिल्पकार - दादासाहेब फाळके
 • फळे व भाज्यांपासून टिकाऊ पदार्थ
 • संगीत आणि कल्पकता
 • पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास
 • महाराष्ट्राचे शिल्पकार – वसंतराव नाईक
 • आशियाई क्रीडास्पर्धा
 • कात्यायन शुल्ब सूत्रे
 • महाराष्ट्राचे शिल्पकार - भाई उद्धवराव पाटील
 • महाराष्ट्राचे शिल्पकार - बॅ. राजाभाऊ खोब्रागडे
 • सर्वज्ञ श्री चक्रधर
 • विलक्षण जपानी
 • मोरस-मराठी कविता दशावतार
 • चरियापिटक
 • चिरकालीन सिरॅमिक्स
 • पाणी पुरवठा
 • Maratha Wall Paintings
 • भरताच्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय
 • महाराष्ट्राचे शिल्पकार –महर्षी धोंडो केशव कर्वे
 • कल्लपा यशवंत ढाले ह्यांची दुर्मिळ डायरी
 • मराठी वाङ्‍मयकोश खंड ३ रा ग्रंथपरिचय इ.स. १८५८ ते १९६०
 • तार्‍यांचे अंतरंग
 • महाराष्ट्राचे शिल्पकार – यदुनाथ थत्ते
 • महाराष्ट्राचे शिल्पकार - डॉ. विठ्ठलराव विखेपाटील
 • मानवी आनुवंशिकता
 • मराठी वाङ्‍मयकोश खंड दुसरा भाग एक मराठी ग्रंथकार दिवंगत
 • वंश आणि वंशवाद
 • जीवनसंग्राम
 • स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र
 • आरोग्य आणि आहारशास्त्र
 • समर्थ रामदासांची साहित्य सृष्टी
 • हॉकी
 • संगीताचार्य पं. विष्णु नारायण भातखंडे
 • महाराष्ट्राचे शिल्पकार - नाना पाटील
 • आसरा
 • खानदेशातील कृषक जीवन - सचित्र कोश
 • लुकेना
 • मधुमेह
 • महाराष्ट्राची सागरी मत्स्यसंपत्ती
 • महाराष्ट्राचे शिल्पकार - तेजस्विनी अहिल्याबाई होळकर
 • महाराष्ट्राचे शिल्पकार - शंकरराव किर्लोस्कर
 • उद्‌भट आणि त्याचा काव्यालंकार सारसंग्रह
 • महात्मा ज्योतिराव फुले
 • नाट्यमंडप
 • सुती वस्त्रोद्योग
 • डिझेल एंजिन
 • धन्याचा बंदा गुलाम
 • शरीर -एक समरांगण
 • संहितासमीक्षा आणि पारिभाषिक संज्ञा
 • एमिली डिकिन्सन: निवडक कविता
 • बहुरूपी बहुगुणी कार्बन
 • लिओनार्दो दा विंची
 • श्री संत शुभराय महाराज कलाकृतीसंग्रह-चित्रचिरंतन
 • झुंडशाहीचे बंड
 • मोरस कथा दशावतार
 • महात्मा गांधी – रविंद्रनाथ ठाकूर
 • सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने
 • महाराष्ट्राचे शिल्पकार - ताराबाई शिंदे
 • टोळ्ळुगट्टी
 • भौतिकी शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -भाग १ ते ५
 • ट्रांझिस्टर
 • कबड्डी

अपूर्ण यादी

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →