Back

ⓘ संस्कृती या संस्कृत शब्दाचा अर्थ चांगले करणे असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, ..                                               

माळवा संस्कृती

माळवा संस्कृतीचा उगम आणि विस्तार प्रथम माळव्यात झाला,हे तिच्या नावावरूनच स्पष्ट होते." माळवा संस्कृती मध्यप्रदेशात इसवी सनाच्या पूर्वी १८०० - १२०० या कालखंडात अस्तित्वात होती. नर्मदा नदीवरील महेश्र्वरच्या पलीकडील तीरावर नावाडाटोली नावाचे माळवा संस्कृतीचे महत्त्वाचे स्थळ आहे.त्याखेरीज मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण,उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्त्वाची स्थळे आहेत.

                                               

द्रविड संस्कृती

भारतीय उपखंडात हडप्पा संस्कृतीचा विस्तार पश्चिमेला सिंधू नदीपासून पूर्वेला उत्तर प्रदेशपर्यंत आणि उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला दक्षिण महाराष्ट्रा पर्यंत झाला.या संस्कृतीची जडणघडण द्रविड, ब्रहुयी, पणी, व्रात्य, असुर, नाग, दास, वाहिक, सुमेरियन आदी मानव समुहांनी केली.त्यात द्रविडांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून हडप्पा संस्कृतीला द्रविड संस्कृती असे म्हणतात.

                                               

धनगर

धनगर हा एक हिंदू समाज आहे, जो प्रामुख्याने शेती आणि पशुपालन व्यवसाय करतो. धनगर लोक मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा, गोवा इत्यादी राज्यांत राहतात. सम्राट चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक.मल्हारराव होळकर व अहिल्यादेवी होळकर हे या समाजातील भारतीय राज्यकर्ते होते. या समाजाचे दैवत जेजुरीचा खंडोबा आहे.

                                               

शं.बा. जोशी

शंकर बालदीक्षित जोशी हे एक कानडी विद्वान होते. बेळगाव जिल्ह्यात बालपण गेल्यामुळे त्यांना मराठीही उत्तम येई. अनेक कानडी पुस्तकांसह, काही पुस्तके त्यांनी मराठीतही लिहिली होती, त्यांची यथावकाश कानडी भाषांतरे झाली.

                                               

अंगठी

अंगठी हाताच्या बोटांत घालायचा दागिना आहे.पुरातन काळापासून आपल्या देशात अंगठ्या घालताची चाल आहे. पुरुष आणि स्त्रिया, दोघेही अंगठी धारण करू शकतात. सहसा अंगठ्या सोने, चांदी, प्लॅटिनम, इ. मौल्यवान धातूंच्या असतात. अंगठ्या वळ्यांसारख्या गोलाकार किंवा एका बाजूस सपाट पृष्ठभाग आणि नक्षी असलेल्या असतात. अनेकदा या सपाट पृष्ठभागावर कोंदण करून त्यात मौल्यवान खडेही बसविले जातात. अंगठीच्या पृष्ठभागावरील नक्षीमध्ये स्वतःची ओळख पटविणारी चिह्ने घालून त्याचा उपयोग मोहोर किंवा शिक्का म्हणून होत असे.

                                               

प्रतिलोम विवाह

भारतीय संस्कृती मध्ये प्राचीन व अर्वाचीन काळी समाजव्यवस्थेत चार वर्ण अस्तित्वात होते. या चार वर्णातील खालच्या वर्णाच्या पुरुषाने वरच्या वर्णाच्या स्त्रीशी केलेला विवाह म्हणजे प्रतिलोम विवाह होय. उदा० शूद्र वर्णाच्या पुरुषाने ब्राह्मण वर्णाच्या स्त्रीशी केलेला विवाह.

                                               

इस्लाम देवता

मुस्लिम धर्म संस्कृती मध्ये पवित्र कुराण तत्त्वावर आधारित अल्ला चे देवदुत म्हणजे देव किंवा हजरत असे आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ हजरत सैलानी बाबा आहेत. राजस्थानचे मुस्लिम आराध्यदैवत अजमेर शरीफ हजरत ख्वाजा बाबा मैनुद्दीन चिस्ती आहे.

                                               

अक्षरधारा

अक्षरधारा बुक गॅलरी ही १९९४ पासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पुस्तकांची प्रदर्शने भरवणारी पुण्याची नामांकित संस्था आहे.ही संस्था साहित्य व संस्कृतीविषयक विविध उपक्रमांद्वारे वाचकांच्या मनांत पुस्तकांविषयी प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी वाढावी यासाठी प्रयत्नशील असते.पुण्यात बाजीराव रस्ता आणि डहाणूकर कॉलनी, कोथरूड येथे अक्षरधाराची पुस्तक दालने आहेत. रमेश राठिवडेकर हे अक्षरधाराचे संचालक आहेत. रघुवीर ढवळे यांनी सुरू केलेल्या ढवळे ग्रंथ यात्रेच्या सुरूवातीपासून ते अखेरीपर्यंत १९८६ ते १९९३ या काळात राठिवडेकर तेथे शिपायापासून ते व्यवस्थापक पदापर्यंत कार्यरत होते. या अनुभावाच्या जोरावरच त्यांनी १३ ऑक ...

                                               

अनुबोधपट

ज्या चित्रपटांमधून समाजाला प्रेरणा मिळेल,शिकवण मिळेल अशा छोट्या चित्रपटांना अनुबोधपट असे म्हणतात. भारतीय संस्कृती,स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणारे स्वातंत्र्य सेनानी,सामाजिक श्रद्धा, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवरील अनुबोधपट लोकशिक्षणाचे कार्य करतात. अनुबोधपट हे आधुनिक भारतीय इतिहासाच्या अभ्यासाची महत्वाची साधने आहेत.

                                               

भारतातील अल्पसंख्यांक विषयक तरतुदी

अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा, यासाठी संविधानात या वर्गांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. धर्म,वंश,भाषा,जात,प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आला आहे. अल्पसंख्यांकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. अल्पसंख्यांकांची भाषा,संस्कृती,लिपी,धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

                                               

नॉर्मन झिडे

नॉर्मन एच. झिडे) हे शिकागो विद्यापीठातील एमेरिटस प्राध्यापक आहेत. भाषाविज्ञान विभागात दक्षिण आशियाई भाषा व संस्कृती विभागात त्यांनी चार दशके हिंदी व उर्दू शिकविली आणि या विषयावरील अनेक पुस्तके व लेख प्रकाशित केले. तथापि, त्यांची मोठी ख्याती मुंडा भाषा आणि सर्वसाधारणपणे ऑस्ट्रो-आशियाई भाषाविज्ञानाच्या योगदानावर आहे. भाषांतरकार म्हणून त्यांनी बऱ्यापैकी काम केले आहे, विशेषतः काव्यांच्या भाषांतरांचे. ऑक्सफोर्ड अ‍ॅन्थॉलॉजी ऑफ मॉर्डन इंडियन पोएट्री मध्ये त्यांनी उत्तर भारतीय आणि ऑस्ट्रो-आशियाई या दोन्ही प्रकारच्या भाषांमधून कवितांचे भाषांतर केले किंवा त्यास सहाय्य केले. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण ...

                                               

सेंटिनेली भाषा

सेंटिनेली भाषा हे भारताच्या अंदमान व निकोबार बेटांमधील, उत्तर सेंटिनल बेटावर राहणाऱ्या सेंटिनली लोकांच्या देण्यात एक नाव आहे भाषिकदृष्ट्या अभ्यास न केलेल्या भाषेला दिलेले तात्पुरते नाव आहे. सेन्टिनेली लोक आणि उर्वरित जगाचा संपर्क नसल्यामुळे त्यांच्या भाषेविषयी किंवा त्यातील चैतन्य याबद्दल फारशी माहिती नाही. सेंटिनली लोक त्यांच्या बेटावर बाहेरील लोकांना येऊ देत नाहीत आणि सामान्यत: अभ्यागतांकडे वैरभाव दाखवितात. मैत्रीपूर्ण संवाद खूपच कमी वेळा घडले आहेत.

                                               

झी मराठी सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्कार

                                               

संपर्क भाषा

संपर्क भाषा, किंवा जनभाषा म्हणून ओळखली जाणारी भाषा किंवा पोटभाषा म्हणजे अशी भाषा जी सामान मूळ भाषा किंवा बोली नसलेल्या लोकांच्या गटात संवाद साधण्यासाठी पद्धतशीरपणे वापरली जाते, विशेषत: जेव्हा ती तिसरी भाषा असते जी दोन्ही गटांच्या मूळ भाषेपेक्षा वेगळी असते. संपर्क भाषा संपूर्ण मानवी इतिहासात जगभर, कधीकधी व्यावसायिक कारणास्तव तथाकथित "व्यापार भाषा" व्यापारात सुलभ होते, तर बरेचदा सांस्कृतिक, धार्मिक, मुत्सद्दी आणि प्रशासकीय सोयीसाठी आणि विविध देशांचे वैज्ञानिक आणि इतर विद्वान यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्याचे साधन म्हणून विकसित झाल्या आहेत. जागतिक भाषा - ही भाषा आंतरराष्ट्रीय आणि बर्‍याच ...

                                               

डॅनिश भाषा परिषद

डॅनिश भाषा परिषद डॅनिश भाषेची अधिकृत नियामक संस्था आहे जी डॅनिश मंत्रालयाच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा एक भाग आहे आणि या परिषदेचे मुख्यालय बोगेन्स येथे आहे. या परिषदेची स्थापना १९५५ मध्ये झाली. या समितीचे तीन मुख्य उद्दीष्टे आहेत: डॅनिश भाषा आणि त्याचा वापर याबद्दलच्या चौकशींचे उत्तरे देणे भाषेच्या विकासाचे अनुसरण करणे अधिकृत डॅनिश शब्दकोश, रेत्सक्रिव्हनिंगसोर्दबोगेन अद्यतनित करणे समितीचे कार्यरत सदस्य लेखी व प्रसारित माध्यमांचे अनुसरण करतात, नवीन शब्दाचा मागोवा ठेवण्यासाठी पुस्तके वाचतात आणि त्यांचा उपयोग नोंदवितात. उल्लेखनीय मानले जाणारे मुद्रण आणि भाषणात पुरेसे दिसणारे नवीन शब्द रेत्सक्रि ...

                                               

बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्ह्णून ओळखला जातो. बैलगाडा शर्यतीवरील बंदी व सततचा दुष्काळ यामुळे राज्यातील देशी जनावरांमधील सर्वात सुंदर व रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी दुभत्या जनावरांतील खिल्लार जात काही दिवसात नामशेष होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापुढे खिल्लार गाई असायची, त्याला कारणही तसंच होतं. खिल्लार या गाईच्या दुधापासून एक प्रकारची ऊर्जा मिळायची. बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र, बैल आणि शेतकरी हे नाते पूर्वापार चालत आलेले असून, बैल आणि शेतकरी नात्यात बैलगाडा शर्यतीच्या आडून भेद निर्माण करण्याचे ...

संस्कृती
                                     

ⓘ संस्कृती

संस्कृती या संस्कृत शब्दाचा अर्थ चांगले करणे असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.

संस्कृती ही विविध अर्थच्छटा असणारी संकल्पना आहे. हा शब्द सहसा खालीलपैकी एखादा अर्थ ध्वनित करण्यासाठी योजला जातो:

  • एखाद्या संस्थेच्या / संघटनेच्या किंवा एखाद्या समूहाच्या प्रवृत्ती, मूल्ये, ध्येये, प्रथा-प्रघात इत्यादी सामायिक बाबी
  • मानवी ज्ञान, समजुती, वर्तणुकी इत्यादींचा एकत्रित परिपाक
  • कला व शास्त्रे यांतील उच्च अभिरुची - अर्थात अभिजात संस्कृती
                                     

1. आशय

मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे, तर स्वत:चा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वत:त बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.

                                     

2. संस्कृतीची रूपे

संस्कृतीची दोन रूपे असतात, एक डोळ्याला जाणवणारे व दुसरे ज्ञानेंद्रियांद्वारे जाणवणारे. याविषयी इरावती कर्वे यांनी नोंदविले आहे- "व्यक्ती या घरे,कपडे इ.स्थूल वस्तूंचा उपभोग घेत असतात. हे संस्कृतीचे बाह्य रूप. संस्कृतीचे दुसरे रूप म्हणजे माणसाने सामाजिक जीवन जगण्यासाठी ठरवून घेतलेली रीत होय. योग्य-अयोग्य,पाप-पुण्य, इत्यादी.संकल्पना तसेच कौटुंबिक नाती, वागणूक इत्यादी.गोष्टी या परंपरागत असतात. या गोष्टी माणूस एकटा निर्माण करीत नाही, तो समूहाने त्या करत असतो. भारतीय संस्कृती कोश खंड नववा

                                     

3. वाचन संस्कृती

बदलता वाचनव्यवहार:-

टी.व्ही, रेडिओ,इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर यांसारख्या आधुनिक प्रसारमाध्यमाच्या उपलब्धतेचा साहित्यव्यवहार आणि वाचनसंस्कृतीवर जाणवण्याइतपत परिणाम झाल्याचे दिसते. आधुनिक वाचकवर्ग या प्रसारमाध्यमाच्या विळख्यात सापडल्याने वाचन संस्कृतीवर काय चांगले वाईट परिणाम झाले हे बघणे गरजेचे आहे. सध्या वाचनव्यवहार लोप पावत चालला आहे, लोक वाचत नाहीत. मराठी पुस्तकांना पहिल्यासारखा वाचक मिळत नाही. असा काहीसा ओरडा साहित्य व्यवहारात होताना दिसतो आहे. आधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावांमुळे पुस्तकांचा वाचक वर्ग दुरावला आहे. ओरडा विचारवंत, प्रकाशक, लेखक, पत्रकार मंडळींनी जो केला आहे. त्या ओरडण्यात कितपथ तथ्य आहे हे बघणे महत्त्वाचे आहे.

पूर्वीचा काळ असा होता की, पुस्तकाचे वाचन करणे, संग्रह करणे हे वैचारिक श्रीमंतीचे एक लक्षण समजले जाई. पुस्तकाचे आदान प्रदान केले जाई.कोणी कोणती पुस्तके वाचली, त्यांतून काय मिळाले, याविषयी आपसात चर्चा-वादविवाद व्हायचे. चांगल्या कथा‍- कादंबऱ्या या वाचताना वाचक एका भावनिक स्थितीत हरवला जायचा. काव्य, कथा, नाट्य, प्रवासवर्णन, ललित, वैचारिक गद्य यांच्या वाचनाने रसिक वाचक आणखी समृद्ध होत जायचा. विविध ग्रंथप्रकाशने, नियतकालिके, मासिके, वृत्तपत्राच्या रविवारच्या अंकातील साहित्यिक पुरवण्या यांवर वाचकांच्या अक्षरशः उड्या पडायच्या. एखाद्या चांगल्या पुस्तकाच्या सर्व आवृत्या रांगा लावून हातोहात खपल्या जायच्या असा तो वैभवाचा काळ.बघता बघता हा वाचनसंस्कृतीच्या वैभवाचा काळ लोप पावला.टी.व्ही, रेडिओ, इंटरनेट, डीव्हीडी, व्हीसीडी प्लेअर, सोशल मेडिया, फ़ेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, इन्स्टाग्रॅम यांसारख्या आधुनिक करमणुकीच्या प्रसारमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वाचक पुस्तके वाचेनासा झाला. रांगा लाऊन विकली जाणारी पुस्तके सवलत देऊनही विकली जात नसल्याच्या प्रकाशकांच्या ओरडण्यात तथ्य असल्याचे दिसते.

आधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे वाचक ग्रंथ वाचनापासून दुरावत का गेला? वाचन संस्कृतीचा लोप का झाला? या विधानांची चर्चा करताना वर उल्लेखलेल्या आधुनिक प्रसारमाध्यमांचा प्रभाव तर परिकणामकारक आहेच पण याशिवाय आणखीही काही कारणे आहेत. पूर्वी करमणुकीच्या साधनांचा अभाव असल्यामूळे लोक फावल्या वेळेत ग्रंथवाचनाकडे वळत. मात्र सध्या करमणुकीच्या साधनाचा विकास झाला आहे. टी.व्ही. चॅनेल्सच्या वाढत्या संख्येमुळे लोकांना घरबसल्या जगाच्या कान्याकोपर्‍%यातली कोणत्याही विषयाची माहिती अत्यंत थोडक्या वेळात आणि परिणामकारक रीतीने मिळू लागली आहे. इंटरनेटवर ‘गुगल’सारख्या सर्च इंजिनद्वारे घरबसल्या कोणत्याही विषयावरील माहिती काही सेकंदात मिळते.आणि बघता बघता सारा समाज गुगलमय होत चालला आहे. तेव्हा तो ग्रंथालयात जाऊन पुस्तकांची शोधाशोध करीलच कशासाठी? हाताचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्याची समाजाची वृत्ती कधीच नसते. कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी श्रमात एखादी गोष्ट मिळत असेल तर ती आजच्या फास्ट जगात कुणालाच नको असते. या सर्व गोष्टींच्या परिणामांमुळे वाचक वर्ग कमी होत चालला आहे. फेसबुक, व्हॉट्‌स‍ॲप ट्विटरर या प्रसार माध्यमांवर लोकांचा जास्त वेळ जात असल्याने वाचक वर्ग कमी होत चालला आहे.

वाचन संस्कृतीचा लोप होत आहे, असे म्हणताना लेखक-प्रकाशकांचीही काही नैतिक जबाबदारी असतेच. काळ बदलत चालला आहे. काळाच्या बदलत्या प्रवाहाबरोबर लेखक-प्रकाशकांनीही बदलायला हवे.सध्या इंटरनेट सारख्या माध्यमांचा चांगल्या प्रकारे वापर करून वाचन संस्कृती वाढवता येईल. इंटरनेट आदी गोष्टी हे वाचन संस्कृतीवर आक्रमण न मानता ती वाचन व्यवहाराला लाभलेली देणगी आहे या भावनेने तिचा वापर करून घेता येऊ शकेल. कारण ह्या आधुनिक प्रसार माध्यमाद्वारे गद्य-पद्य स्वरूपातील साहित्य, चित्रे, अनुदिनीब्लॉग प्रसिद्ध करता येईती.या दृष्टीने ही माध्यमे उपयुक्त ठरतील. मराठीत ई-साहित्य प्रतिष्ठान या संस्थेने पीडीएफ स्वरूपात मराठी पुस्तके विनामूल्य त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. ती पुस्तके आपण डाऊनलोड करून आपल्या मोबाईलवर वाचू शकतो. पुस्तकांचा संग्रहही करू शकतो. इंटरनेट हे माध्यम पुस्तक प्रकाशनापेक्षा स्वस्त, जलद आणि प्रभावी माध्यम आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध केलेले साहित्य काही मिनिटात जगभरच्या वाचकांना उपलब्ध होऊ शकते. त्यावर चर्चा,विचार, परिसंवाद करणे सहज शक्य होते. व्हॉट्‌स‍ॲपसारख्या प्रसारमाध्यमाद्वारे आपण पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांचे आदान प्रधान करू शकतो. ही प्रक्रिया फार जलद गतीने करता येते.                                     

4. हिंदू संस्कृतीचे अन्य विषय

हिंदू संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत

१. ऋणकल्पना- ही भारतीय समाजशास्त्रीय महत्वाचे संकल्पना असून आश्रम व्यवस्थेशी या संकल्पनेची सांगड घातलेली दिसून येते.

२. आश्रम-मानवी आयुष्याचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागाला आश्रम असे नाव दिले आहे.ब्रह्मचर्य, गृहस्थ,वानप्रस्थ आणि संन्यास असे हे चार आश्रम आहेत.

३. पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले असून नीतीशास्त्राच्या दृष्टीने याला विशेष महत्त्वव आहे.

४. चातुर्वर्ण्य-ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण मानले गेले आहेत.

५. प्रतीक संकल्पना- स्वस्तिक, कमळ, कलश,यज्ञ अशी विविध प्रतीके ही भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहेत.

                                               

तोरड्या

तोरड्या हा फार प्राचीन भारतीय अलंकार आहे.लहान मुलेतो पायामध्ये वापरत असत. तोरड्या चांदीच्या असतात. छोट्या रामाच्या पायांतही तोरड्या होत्या.खालील रामदास स्वामींच्या रचनेत तोरड्या चा उल्लेख आहे. "कीरीट कुंडले माला विराजे। झळझळ गंडस्थळ धननिळ तनु साजे। घंटा किंकणी अंबर अभिनव गती साजे। अंदवाकी तोडर नूपुर ब्रीद गाजे।

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →