Back

ⓘ चित्रपट - चलचित्र, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नटरंग, चित्रपट, श्वास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनिल तानाजी सपकाळ, डर, फना ..                                               

चलचित्र

चलचित्र, चलत्-चित्र, चित्रपट, फिल्म किंवा सिनेमा, मूव्ही हे चलच्चित्रणाच्या तंत्रातून साकारणारे एक माध्यम आहे. १९व्या शतकापासून हे माध्यम अस्तित्वात आले. चलच्चित्रणाच्या तंत्रामुळे प्रथमतः मूकपट निर्माण झाले. पुढे ध्वनिमुद्रणाच्या तंत्राची त्याला जोड मिळाली व बोलपट/ बोलते चित्रपट अस्तित्वात आले. चित्रपट हा कंटाळा दूर करण्याच एक उत्तम साधन आहे. १९१३ साली मराठी भाषेतील पहिला चित्रपट "अयोध्येचा राजा" प्रदर्शित झाला. दिग्दर्शक-निर्माते दादासाहेब फाळके. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक. मराठी माणसानेच चित्रपटांची सुरुवात केली, त्यामुळे मुंबई ही चित्रपट क्षेत्राचे मुख्य केंद्र बनली, या केंद्राला बॉलीव ...

                                               

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकारने दिलेले पुरस्कार असून ते फिल्म्फेअर पुरस्काराच्या तोडीचे आहेत. हे पुरस्कार १९५४ सालापासून आधीच्या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना देण्यात येतात. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वांगसुंदर चित्रपटाना दिल्यानंतर, बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.

                                               

नटरंग (चित्रपट)

नटरंग हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, प्रिया बेर्डे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १ जानेवारी २०१० रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे.

                                               

श्वास (चित्रपट)

श्वास हा २००४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. श्वास हा मराठी चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो.याची कथा पुण्यातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. श्यामची आई या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर श्वास या मराठी चित्रपटाला २००४ मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रिय पुरस्कार मिळाला.संदिप सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. याचे चित्रण सिंधुदुर्ग, कोकण, पुणे आणि मुंबईतील केईएम या रुग्णालयात ३० दिवसांमध्ये झाले आहे. श्वास ला मराठी सिनेमामध्ये लक्षणीय वळण आणण्यासाठी ओळखले जाते.हिंदि, बंगाली, तमिळ भाषांमध्येहि हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला मूळ इंग्रजी चित्रपट आहे. सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी ८.९५ कोटी रुपये अर्थसहाय्य दिले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका प्रसिद्ध दक्षिण अभिनेता मामूट्टी यांनी साकारली आहे. हा चित्रपट इंग्रजी व हिंदी व्यतरिक्त मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, उडिया व गुजराती या भाषांत डब झालेला आहे.

                                               

अनिल तानाजी सपकाळ

डॉ. अनिल तानाजी सपकाळ हे एक मराठी नाटककार, चित्रपटकथा लेखक व समीक्षक साहित्यिक आहेत. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख आहेत. तसेच ते इवलेसे|अनिल सपकाळ फुले आंबेडकर अध्यासन मुंबई विद्यापीठ चे समन्वयक व गुरुदेव टागोर तौलनिक साहित्य अध्यासन, मुंबई विद्यापीठ, मुंबई चे प्रभारी विभागप्रमुख आहेत.

                                               

डर (चित्रपट)

डर हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सनी देओल, जुही चावला व शाहरुख खान ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बाजीगरनंतर नकारात्मक भूमिका केलेला हा शाहरूख खानचा दुसरा चित्रपट होता.

                                               

फना (चित्रपट)

फना हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुणाल कोहलीने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान व काजोल ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. फना हा मूळ सूफी शब्द असून त्याचा अर्थ प्रेमामध्ये उध्वस्त होणे असा होतो.

                                               

मशाल (चित्रपट)

मशाल हा १९८४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राचे दिग्दर्शन व निर्मिती असलेल्या ह्या चित्रपटात दिलीप कुमार, वहिदा रेहमान व अनिल कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वसंत कानेटकरांनी लिहिलेल्या अश्रूंची झाली फुले ह्या प्रसिद्ध मराठी नाटकावर हा चित्रपट आधारित आहे.

चांदनी (चित्रपट)
                                               

चांदनी (चित्रपट)

चांदनी हा १९८९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये ऋषी कपूर, श्रीदेवी व विनोद खन्ना ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्रिकोणी प्रेमकथेवर आधरित असलेला ह्या चित्रपटाला मोठे यश मिळाले.

                                               

उत्तरायण (चित्रपट)

उत्तरायण हा शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट बिपीन नाडकर्णी ह्यांनी दिग्दर्शित केला आहे. ह्या चित्रपटाने मराठीत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. चित्रपटाचे कथानक जयवंत दळवी लिखित "दुर्गी" या मराठी नाटकावर आधारित आहे.

                                               

आयमॅक्स चित्रपटगृह

चेन्नई – Luxe IMAX Opening Soon अहमदाबाद – Gujarat Science City बंगळूर – PVR IMAX Feel The Real IMAX मुंबई – IMAX BIG Cinemas चेन्नई – Palazzo IMAX Opening Soon मुंबई – PVR IMAX Digital 3D हैदराबाद – Prasads IMAX 15/70 mm, 3D - Second largest IMAX 3D screen in the world, Most popular IMAX theater in the world

                                               

केरळ राज्य चलचित्र अकादमी

केरळ राज्य चलचित्र अकादमी ही भारताच्या केरळ राज्यातील ना-नफा संस्था आहे. सांस्कृतिक विभागाच्या अखत्यारीत परंतु स्वायत्त असलेली ही संस्था राज्यातील चित्रपटांबद्दलचे काम करते.

                                               

कॉईन टॉस

कॉईन टॉस हा २०१३ सालचा हॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सत्यजित खारकर या मराठी दिग्दर्शकाने केले आहे. अमेरिकेतील "रूट 66 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "ऑडीयन्स फेव्हरीट डेब्युट फिल्म" हा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे.

                                               

चित्रपट निर्माणस्थळ

चित्रपट निर्माणस्थळ किंवा फिल्म प्रॉडक्शनहाऊस/स्टुडिओ. यात वेगवेगळे सेट्स उभारून,चित्रपटाची दृश्ये साकारून जेथे चित्रपटाचे फिल्मांकन केले जाते अशा इमारतींचा समावेश आहे.

                                               

चित्रपट वितरक

चित्रपट वितरक चित्रपट निर्मात्याच्या वतीने चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासाठीचे काम करतात. यासाठी ते चित्रपटगृहे, दूरचित्रवाणीवाहिन्या व इतर वितरणप्रकारांतील कंपन्यांशी संपर्क साधतात व त्यांच्याशी करार करतात.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →