Back

ⓘ शिल्पकला - शिल्पकला, मदुराई, भारतीय शिल्पकला, मूर्तिशास्त्र, बाबूराव पेंटर, पितळखोरे लेणी, नांदगिरी लेणी, अंबा-अंबिका लेणी, चोळ राजांची मंदिरे, कार्मेल बर्कसन ..                                               

शिल्पकला

शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस शिल्प असे म्हणतात. मूर्ती, पुतळे तसेच रचनात्मक आकृतिबंध अशा स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात. संस्कृत साहित्यात मूर्तिकलेचे शास्त्र विकसित झालेले आढळते. मानसार नावाच्या ग्रंथात शिल्पलक्षण नावाचे एक प्रकरण आहे. त्यात मूर्तिकलेविषयी अधिक माहिती दिलेली आहे. भारताच्या स्थापत्य, शिल्पकला, कला आणि हस्तकलेची मुळे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात खोलवर दिसते. भारतीय शिल्पकलेने सुरुवातीपासूनच ...

                                               

मदुराई

मदुराई मराठीत मदुरा Madura, किंवा स्थानिक भाषेत मदुरै-मदुराई किंवा अनेकदा कूडल कूडलनगर ह्या नावाने प्रसिद्ध असणारे शहर. भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे, तसेच मदुरा हे भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले ऐतिहासिक नगर म्हणून देखील ओळखले जाते. हे शहर मदुराई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून तमिळनाडूतील ते तिसरे मोठे शहर आहे. या शहरास सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे. मदुरा हे वैगई ह्या नदीच्या काठी वसले आहे. मदुरेला देवळांचे महानगर किंवा कूडल मानगर असे संबोधले जाते. तसेच ते तमिळनाडू राज्याची सांस्कृतिक राजधानी कलाच्चार तलैनगर म्हणूनही प्रसिद्ध आहे. या शहराला मोगर्‍याचे नगर, तु ...

                                               

भारतीय शिल्पकला

यक्ष-भारतीय शिल्पे यांचा विचार करताना त्यामध्ये बौद्धांचे स्तूप,शैलग्रुहे, पुराणातील हिंदू देवतांची मंदिरे, जैनांची मंदिरे, मूर्ती या सर्वांचा समावेश होतो. भारतीय शिल्पकलेची माहिती घेताना सिंधू संस्कृतीचा आढावा प्रारंभी घ्यावा लागेल.सिंधू संस्कृतीच्या कलात्मक अवशेषात वास्तुशिल्प आणि मूर्तीकला यांचा समावेश होतोसिंधू संस्कृतीमध्ये वापरात असलेली मातीची भांडी, मातीच्या मूर्ती,मुद्रिका हा सुद्धा कलेचा नमुना समजला जातो.मुद्रिकावर बैल,गेंडा, हत्ती अशी प्राण्यांची चित्रे दिसून येतात.या काळातील नगराच्या रचनेत उत्तम भाजलेल्या विटांचा वापर दिसून येतो.सांडपाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था हेही या ...

                                               

मूर्तिशास्त्र

शिल्प, वास्तू व चित्र या तीनही कलांच्या अभ्यासाला मूर्तिशास्त्र म्हंटले जाऊ शकते. शिल्पकला हा मूर्तिशास्त्राचा भाग आहे. तसेच शिल्पकला व मंदिर स्थापत्य यांचा जवळचा संबंध आहे.

                                               

बाबूराव पेंटर

बाबुराव पेंटर यांचा जन्म ३ जून १८९० या दिवशी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.

                                               

पितळखोरे लेणी

पितळखोरे लेणी हा लेणीसमूह औरंगाबाद जिल्ह्यात कन्नडजवळ आहे. हा लेणीसमूह शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते. ही लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन असल्याचे मानले जाते. या लेण्यांच्या कलावैभवाचा सविस्तर अभ्यास डॉ. म.न. देशपांडे यांनी केला आहे.

                                               

नांदगिरी लेणी

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात कल्याणगड ऊर्फ नांदगिरीचा किल्ला आहे. किल्ल्यावरच्या लोखंडी दरवाजातून एक वाट गडाकडे जाते, तर दुसरी कड्याच्या कडेने एका गुहेत उतरते. याच गुहेत ही लेणी आढळतात. यांत काही लेण्यांचे खोदकाम आहे. परंतु पाणी भरल्यामुळे ही लेणी जलमय झाली आहेत. पाण्यातून सुमारे ३५ मीटर चालल्यावर पार्श्वनाथाची मूर्ती दिसते.

                                               

अंबा-अंबिका लेणी

अंबा-अंबिका लेणी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यामध्ये असलेली लेणी आहे. इ.स.पू. पहिल्या शतकात ही लेणी निर्माण केलेल्या आहेत. यात बौद्ध विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे यासारखी ३३ खोदकामे दिसून येतात.

                                               

चोळ राजांची मंदिरे

चोळ राजांच्या साम्राज्याततमिळ राष्ट्राने कला साहित्य आणि धर्म ह्या क्षेत्रात प्रगतीचे उच्च शिखर गाठले. पल्लवांच्या राज्यात आरंभ झालेल्या सांस्कृतीक आंदोलनाचे आपले शिखर चोळांच्या शासनात गाठले.भारतात ह्या पूर्वी कधीही न झालेल्या शिल्पकला,वास्तूकला आणि धातूपासून पुतळ्यांची निर्मितीस प्रारंभ झाला आणि भारतीय इतिहासात एका नव्या पर्वाने प्रारंभ केला.पल्लवांच्या शासनात सुरु झालेल्या भव्यदिव्य देवळांची निर्मिती तशीच चालू ठेवत चोळ राज्यकर्त्यांनी त्यात अधिक भर घालून द्राविडी वास्तूशिल्पकलेला नवसंजीवनी प्राप्त करून दिली.

                                               

कार्मेल बर्कसन

कार्मेल बर्कसन या अमेरिकन शिल्पकार आहेत. यांनी भारतीय शिल्पकला आणि स्थापत्यकलेवर संशोधन करुन अनेक पुस्तके लिहिली आहेत. बर्कसन यांनी ड्यूक युनिव्हर्सिटीतून इतिहास विषयात पदवी मिळवली व नंतर त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये मिल्टन हेबाल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकला शिकल्या. बावीस वर्षे शिल्पे निर्माण केल्यावर बर्कसन १९७०मध्ये भारतात पर्यटनासाठी आल्या. त्यावेळी त्या एलिफंटा, वेरुळ आणि महाबलिपुरम येथील शिल्पकृती पाहण्यासाठी गेल्या. प्राचीन भारतीय शिल्पकलेने त्या प्रभावित झाल्या. त्यानंतर त्यांनी भारतास वारंवार भेटी दिल्या व तेथील शिल्पकला आणि स्थापत्यकलेच्या स्थळांना गेल्या. १९७७मध्ये त्य ...

                                               

कातळ खोद शिल्प (चित्र)

प्राग् ऐतिहासिक काळातील सांस्कृृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे महत्त्व विशेष आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे गूढ आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना राॅक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्सया नावाने ओळखले जाते. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात.

                                               

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

मराठवाडा परिसर प्राचीन शिल्प स्थापत्य अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत. सातवाहनांपासून यादव काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले.प्रतिष्ठाननगरी ही त्यांची राजधानी होती. वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० अ ...

                                               

कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर

कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.

                                               

खिद्रापूर

खिद्रापूर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातले एक गाव आहे. हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ते कोल्हापूरपासून अंदाजे ८० किलोमीटर दूर व नरसोबाच्या वाडीपासून अदाजे २४ किलोमीटरवर आहे. जयसिंगपूर हे येथून जवळचे रेल्वे स्टेशन आहे. खिद्रापूर गावासाठी कुरुंदवाड बस आगरामधून बसगाड्या सुटतात. खिद्रापूरचे प्राचीन नाव कोप्पम असे असून प्राचीन काळातील ही एक प्रसिद्ध युद्धभूमी असल्याचे संदर्भ आढळतात. खिद्रापूरचा कोप्पेश्वर महादेव: कृष्णेच्या काठी असलेले खिद्रापूर येथील कोप्पेश्वर महादेवाचे मंदिर मुद्दाम वेळ काढून पाहण्याजोगे आहे. कोल्हापूरपासून ६० कि.मी. वर असलेले इतके सुंदर आ ...

                                               

गांधार शैली

पश्चिम पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, काश्मीरचा दक्षिण व पश्चिम भाग आणि अफगाणिस्तान या सगळ्यांचा मिळून होणारा प्रदेश पूर्वी "गांधार" नावाने ज्ञात होता. या भागात युरोपीय व पश्चिम आशियातील वेगवेगळ्या ठिकाणचे लोक व्यापाराच्या व सैनिकी पेशाच्या निमित्ताने स्थायिक झाले होते.खुद्द ग्रीकांचे येथे काही काळ वास्तव्य होते. त्यानंतर ओळीने शक, पल्लव, कुषाण यांची सत्ता प्रस्थापित झाली. येथे आलेल्या कलाकारांना राजसभेत आश्रय दिला गेला. या कलाकारांनी कलाविषयक तंत्र आणि कौशल्ये यासंबंधी धार्मिक व सांस्कृतिक कल्पनाही आपल्या बरोबर आणल्या होत्या. या रुढी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गांधार शिल्पात प्रतिबिंबीत झाल ...

                                               

चालुक्य शिल्पस्थापत्य शैली

चालुक्य शिल्पस्थापत्य शैली ही इ.स.च्या ६ व्या व इ.स.च्या १२ व्या शतकांदरम्यान अस्तित्वात असलेल्या चालुक्य साम्राज्यात प्रचलित असलेली स्थापत्यशैली होती. चालुक्य शिल्पस्थापत्य शैलीची देवालये उंच जोत्याची असतात. ९ ते १० फूट जोते ठेणयाचा प्रघातही या पद्धतीत होता. ही देवालये सामान्यपणे चौथऱ्यावर उभारली जातात. देवालयाची स्थापत्य रचना तारकाकृती किंवा अष्टभद्र आराखड्यावर आधारित असते. देवालयाचा छज्जा सरळ, जाड आणि रुंद ठेवण्याची पद्धत असते. चालुक्य शिल्पस्थापत्य कलापरंपरेत अनेक वैशिष्ट्ये आढळतात. या प्रकारच्या देवालयातील द्वारपट्टिका विशेषरीत्या अलंकारिक असतात. तेथे कलशपात्राची शिल्परचना असते. उंबरठ ...

                                               

चैत्य

चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. बौद्ध धर्मीयांच्या प्रार्थनास्थळाला चैत्य किंवा चैत्यगृह म्हणतात. हे बौद्ध सत्पुरुषांचे समाधिस्थळ असते. येथे बौद्ध संतांच्या अवशेष असलेल्या समाध्या असतात. हे स्तूपाप्रमाणे दिसते. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. चैत्यगृहे ही धनुष्याकार आकाराची असून त्यांच्या गोलाकार भागात अंडाकृती आकाराचा स्तूप कोरलेला असतो. वरती गजपृष्ठाकृती छप्पर कोरलेले असते. चिता किंवा चिती या संस्कृत शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे.

                                               

मंदिरपथगामिनी

गणपतराव म्हात्रे यांनी हे शिल्प सर जे. जे. कला महाविद्यालयात शिकत असताना वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे साधारणपणे इ.स. १८९७ साली घडविले होते. प्रथम हे शिल्प त्यांनी शाडूची माती वापरून घडविले पुढे इ.स. १९०० साली याच शाडूच्या शिल्पावरून त्यांनी संगमरवरी शिल्प घडविले. हे शिल्प बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात आणि पुढे परदेशातही प्रदर्शित करण्यात आले होते. या कलाकृतीचे शिल्पकार म्हणून गणपतराव म्हात्रे यांना बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी रु. २०० चे बक्षीस देऊन गौरविले होते. पुढे सर जे.जे. कला महाविद्यालयाने हे शिल्प १,२०० रुपयांस आपल्या चित्रशाळेसाठी विकत घेतले होते.

                                               

महाबलीपुरम लेणी

महाबलीपुरम लेणी भारतातील चेन्नई शहरापासून ५५ किमी अंतरावर असलेली लेणी आहेत. इ.स.१९८४ साली ही लेणी जागतिक वारसा म्हणून घोषित झाली आहेत. महाबलीपुरम दक्षिण भारतातील एक ऐतिहासिक स्थान व प्राचीन संस्कृतीचे केंद्र समजले जाते. पुराणप्रसिद्ध बलीराजावरून या गावाला महाबलीपुरम हे नाव मिळाले.मम्मलापूर असेही याचे एक प्राचीन नाव आहे.

                                               

लेणे

लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा होत. ज्यांच्या उपयोग संन्यासा–भिक्खूंना तपस्या-साधना-विश्रांती करण्यासाठी केला जाई. लेणी ही प्रामुख्याने सातवाहन, वाकाटक व राष्ट्रकूट या राजवंशाच्या काळात कोरली गेली. अशा वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा, कार्ले, कान्हेरी, घारापुरी, पितळखोरे, भाजे, वेरूळ ही जगप्रसिद्ध लेणी आहेत. लेण्यांमध्ये चैत्यगृहे, विहार व मंदिर यांचा समावेश आहे. प्रारंभी या लेणी अनलंकृत असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना शैलगृहे, शिलामंदिरे ...

                                               

लोकशिल्पकला

लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे. हडप्पा संस्कृतीत मातीची शिल्पे,देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत.आजही बंगाल,बिहार,गुजरात, महाराष्ट्र,राजस्थान अशा अनेक राज्यांत मातीच्या गणेशाच्या,गौरींच्या मूर्ती तयार केल्या जातात.मातीची खेळणी आणि बैल तयार करण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीत होती.पूर्वजांच्या स्मरणार्थ उभे केलेले लाकडी खांब आणि वीरगळ यांवर शिल्पे कोरली गेलेली पहावयास मिळतात.अशा रितीने धार्मिक कारणांतून व मनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या कारागिरितून लोकशिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासही झाला.

                                               

वीरगळ

वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात.

                                               

वेरूळची लेणी

वेरूळची लेणी इंग्रजी: Ellora Caves ही औरंगाबाद शहरापासून ३० कि. मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी आहेत. यामध्ये १२ बौद्ध लेणे क्र. १ - १२, १७ हिंदू लेणे क्र. १३ - २९ आणि ५ जैन लेणे क्र. ३० - ३४ लेणी आहेत. इ.स. १९५१ साली भारत सरकारने या लेण्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इ.स. १९८३ मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला.कैलास मंदिर या जगातील त्याच्या ...

                                               

शिलालेख

शिलालेख म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर. लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची प्रथा आस्तित्वात होती.पुरातत्व शास्त्रात याला पुराभिलेख असे म्हटले जाते. राजकीय, धार्मिक व सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने असे कोरीव लेख अत्यंत उपयुक्त असतात. शिलालेखातील व्यक्ती नावाच्या आणि अक्षरांच्या वळणावरून त्यांचा काल ठरविता येतो.

                                               

सुरसुंदरी

सुरसुंदरी ही भारतीय शिल्पशास्त्रातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. सुरसुंदरी हे शिल्प भारतातील अनेक मंदिरांच्या कोरीवकामात आढळते. सुर अथवा देवलोकातुन आलेली सुंदर तरुणी असा याचा अर्थ आहे. या मुळात यक्षिणी असतात असा समज आहे. त्या देवदेवतांच्या सेविका अशा रूपात मूर्तीच्या शेजारी कोरलेल्या असतात.मध्ययुगात निर्माण झालेल्या मंदिरांच्या विशेषतः मौर्य काळानंतरच्या मंदिरांमधे या सुंदरी दिसून येतात. स्त्रियांच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि त्यातील त्याची रूपे अशा शिल्पातून अंकित केलेली दिसून येतात. देवाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना बोध करून देणे हा या सुंदरी अंकित करण्यामागचा शिल्पकार आणि निर्मितीका ...

सहावी बौद्ध संगीती
                                               

सहावी बौद्ध संगीती

सहावी बौद्ध संगीती किंवा सहावी धम्म संगीती ही इ.स. १५७ मध्ये सम्राट कनिष्कांच्या काळात गांधार मध्ये संपन्न झाली. स्थापत्य शास्त्रांमध्ये व शिल्पकलेमध्ये निपूण असलेल्या लोकांना भिक्खू संघाने धीरगंभीर मुर्ती बनविण्यास सांगितले. परिणामतः बुद्ध मुर्ती अस्तित्वात आल्या. या कालखंडापर्यंत शिल्पकला साकार करू लागली होती. कनिष्काच्या काळात अनेक भारतीय कलांचा विकास झाला. गांधार चित्रकला, गांधार शिल्पकला, गांधार संगीतकला इ. कलांचा या काळात विकास झाला.

                                               

गणपतराव म्हात्रे

रावबहादूर गणपतराव म्हात्रे हे मराठी शिल्पकार होते. इ.स. १८९१ साली मुंबईतल्या जे.जे. कलाविद्यालयातून ते शिल्पकलेतील परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी घडवलेले मंदिरपथगामिनी हे शिल्प महाराष्ट्रातील व भारतीय उपखंडातील तत्कालीन शिल्पकलेची प्रातिनिधिक कलाकृती मानली जाते.

अजिंठा
                                               

अजिंठा

अजिंठा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील एक गाव आहे. ही लेणी या गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेली लेणी जगप्रसिद्ध आहेत. ही लेणी {जळगाव} तालुक्यापासुन ५५ किमी अंतरावर आहे. लेणी अजिंठा म्हणून ओळखली जातात. हे स्थान प्रामुख्याने बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध चिनी प्रवासी युआन श्वांग याने आपल्या प्रवासवर्णनात या लेण्यांचा उल्लेख केलेला आहे.

भारवाही यक्ष
                                               

भारवाही यक्ष

भारवाही यक्ष ही भारतातील मंदिरांचे बाह्य भागात आढळणारी एक कोरीव मूर्ती आहे. कोरीव काम केलेल्या मंदिरांचे स्तंभांवर ही मूर्ती सहसा असते. स्तंभाचा वरचा भाग जो तुळईला टेकलेला असतो तेथे हिचे स्थान असते. या मूर्तीचा भाव जणूकाही तो पूर्ण तुळईचाच भार उचलीत आहे असा असतो. त्याचे दोन्ही हाताचे तळवे व डोके वरचे बाजूचा भार तोलतांना दाखविण्यात येतात.

मोअई
                                               

मोअई

इ.स. १२०० ते १५०० दरम्यान ईस्टर बेटावरील रापा नुई लोकांनी एका पाषाणात कोरलेल्या भव्य मानवी आकाराच्या शिल्पांना मोअई असे म्हणतात. सर्वांत उंच पुतळा ३३ फूट आणि सर्वांत जड ८६ टन जड आहे.

व्यालमूर्ती
                                               

व्यालमूर्ती

व्याल अथवा यली हा पुरातन मंदिरांच्या शिल्पकलेत कोरल्या जाणारा एक काल्पनिक प्राणी आहे.भारतात बहुतेक पुरातन मंदिरातील कोरीवकामात हा आढळतो. त्याचे शरीर मानवाचे व डोके वेगळ्याच पशूचे अथवा शरीर घोड्याचे अथवा कोणत्याही पशूचे व डोके वेगळ्याच पशूचे असे कोरलेले असते.व्यालमूर्ती ही साधारणतः कोरीव कामातच आढळते. व्याघ्रव्याल, अजव्याल, अश्वव्याल असे विविध प्रकार यात असतात.ही कल्पना शिल्पकारास गजमुखावरुन सुचली असेल असा अदमास आहे. याचा वापर दक्षिण भारतातील मंदिरांच्या बांधकामात व्यापकपणे केलेला आढळतो.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →