Back

ⓘ साम्राज्ये - सप्त-वार्षिक युद्ध, जॉर्डन, भारत, अखंड भारत, साम्राज्य, जीवशास्त्र, कर्नाटक, रेशीम मार्गाद्वारे बौद्ध धर्माचा प्रसार, पाकिस्तान, बौद्ध कला, वाकाटक ..                                               

सप्त-वार्षिक युद्ध

सप्त-वार्षिक युद्ध १७५५ आणि १७६४ दरम्यान लढले गेले, मुख्य संघर्ष १७५६ पासून १७६३ पर्यंत सात वर्षांच्या कालावधीत झाला. ग्रेट ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र, पोर्तुगिज राजतंत्र आणि काही छोटी जर्मन साम्राज्ये विरुद्ध फ्रान्सचे राजतंत्र, रशियन साम्राज्य, स्पॅनिश साम्राज्य स्वीडिश साम्राज्य आणि मुघल साम्राज्य आसे हे युद्ध होते.

                                               

जॉर्डन

जॉर्डन, अधिकृत नाव जॉर्डनाचे हाशेमी राजसत्ताक हा पश्चिम आशियातील एक राजसत्ताक देश आहे. हा देश जॉर्डन नदीच्या पूर्व तीरावर वसला असून याच्या आग्नेयेस सौदी अरेबिया, पूर्वेस इराक, उत्तरेस सीरिया व पश्चिमेस मृत समुद्रावर सह-अधिकार असलेले इस्राएल व वेस्ट बॅंक हे देश आहेत. अम्मान ही जॉर्डनाची राजधानी आहे.

                                               

भारत

भारत किंवा भारतीय गणराज्य हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज आहे परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.

                                               

अखंड भारत

अखंड भारत ही संकल्पना आहे. या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकिकरण होणे आपेक्षित आहे. प्राचीन कालापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्ये, संस्थाने, साम्राज्ये यात विभागला गेला आहे, याचे एकत्रिकरण कमीवेळा झाले. अखंड भारत या संकल्पनेत, सद्य भारत तसेच पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ व ब्रम्हदेश, "अफगाणिस्तान, भूटान,हिमालय,श्रीलंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रिकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून संघात साजरा केला जातो. हा दिवस इस्रायल स्थापन होण्यापूर्वी ज्यू लोक पाळत असलेल्या वार्षिक समारोहाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे वर्षातून एक दिवस ज्यू लोक ...

                                               

साम्राज्य (जीवशास्त्र)

कधी कधी या तक्त्यात शेजारी असलेले वर्ग पुर्णत्वाने सारखे नसतात. तरीही, या त्रुटीखेरीज, हा तक्ता बरीच माहिती पुरवतो. For example, Haeckel placed the red algae Haeckels Florideae; modern Florideophyceae and blue-green algae Haeckels Archephyta; modern Cyanobacteria in his Plantae, but in modern classifications they are considered protists and bacteria respectively. संदर्भ ↑ Carl R. Woese, Otto Kandler, Mark L. Wheelis: "Towards a Natural System of Organisms: Proposal for the domains Archaea, Bacteria, and Eucarya", doi:10.1073/pnas.87.12.4576

                                               

कर्नाटक

कर्नाटक Karnataka हे भारताच्या दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक राज्य आहे. राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व १९७३ मध्ये या राज्याचे नाव कर्नाटक असे बदलण्यात आले. कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तमिळनाडू ही राज्ये येतात. राज्याचे क्षेत्रफळ १,९१,९७६ चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे. कर्नाटक राज्यात २९ जिल्हे आहेत. कन्नड ही राज्य ...

                                               

रेशीम मार्गाद्वारे बौद्ध धर्माचा प्रसार

बौद्ध धर्माचा पहिल्या किंवा दुसऱ्या शतकाच्या सुरूवातीस रेशीम मार्गाने चीन मध्ये प्रवेश झाला. चीनमधील बौद्ध भिक्खू सर्व परदेशी प्रथम दस्तऐवजीकरण अनुवादाच्या प्रयत्नांत कुषाण साम्राज्याच्या विस्ताराने कनिष्कच्या खाली असलेल्या तारीम बेसिनच्या चिनी प्रदेशात प्रवेश केला. मध्य आशिया आणि चिनी बौद्ध धर्माच्या दरम्यान थेट संपर्क ३ ते ७ व्या शतकात संपूर्णपणे चालू राहिला, तसेच तांग साम्राज्याच्या कालावधीत. चौथ्या शतकापासून फॅक्सन याने भारताची भेटीत ३९५-४१४ आणि नंतर जुआनझांग याने भारत भेटीद्वारे ६२९-६४४ उत्तर भारतात स्वतःहून प्रवास करण्यास सुरुवात केली. बौद्ध धर्म आणि मूळ ग्रंथ मिळविण्यासाठी त्यांचा उ ...

                                               

पाकिस्तान

पाकिस्तान एक देश असून, भारताच्या वायव्य सिमेवरील देश आहे. पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची ही सर्वात मोठे शहर आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १६ कोटी असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमा॓क लागतो. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, भूगोल, वन्यप्राणी यात प्रचंड विविधता पाकिस्तानात आढळते. पाकिस्तान हा एक विकसनशील देश असून, औद्योगिकरण हे उर्जितावस्तेत आहेत. लष्करी राजवट, राजकीय अस्थिरता, शेजारी भारतासोबत असलेलेक्रम ...

                                               

बौद्ध कला

बौद्ध कलेची सुरुवात गौतम बुद्धांच्या जीवन आणि शिकवणुकीला समाजात रुजवण्यासाठी इ.स.पूर्व ५-६ व्या जम्बूद्विपामध्ये झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक संस्कृतींसह तिचा झपाट्याने विकास होऊन ती आशिया तसेच जगात इतर ठिकाणी पसरली. बौद्ध कलेमध्ये मुख्यतः विविध प्रकारची बुद्ध विहारे, लेण्या, दगडावरील कोरीव चिन्हे, बुद्धांच्या विविध मुद्रा व प्रतिमांचा समावेश होतो. जसजसा बौद्ध धर्माचा प्रसार होत गेला तसतशी बौद्ध कलेच्या विकासाला गती मिळत गेली. बौद्ध कलेचा विकास मुख्यतः दोन शाखांमध्ये झाला. उत्तर शाखा; ज्यामध्ये मध्य आशियातून उत्तरेकडे तसेच पूर्व एशियाकडे आणि दक्षिण शाखा; ज्यामध्ये पूर्व तसेच दक्षिण-प ...

                                               

साम्राज्यवाद

साम्राज्यवाद इंग्लिश: Imperialism इंपेरिॲलिझम) हा शब्द Imperium इंपेरियम या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. हा शब्द साम्राज्य प्रस्थापित करण्याचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद असे म्हणतात. साम्राज्यवादात एखादा बलाढ्य देश किंवा राष्ट्र दुसऱ्या कमकुवत देशाच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य प्रस्थापित करून तो भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणतो. साम्राज्यवादासाठी बहुधा लष्करी बळाचा वापर केला जातो. नव्या भूभागांवर वसाहती स्थापन करणे हे देखील साम्राज्यवादाचेच उदाहरण आहे. अनेक विचारवंत लेखक व ...

                                               

अग्निबाण

रॉकेट एक रॉकेट इंजिनमधून जोर मिळवणारे एक क्षेपणास्त्र, अवकाशयान, विमान किंवा अन्य वाहन आहे. ज्वलनातून उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोताने पुढे जाणाऱ्या वाहनास अग्निबाण असे म्हणतात. यात खास प्रकारचे इंधन वापरले जाते. रॉकेट इंजिन कृती आणि प्रतिक्रियाद्वारे कार्य करतात. खरं तर, रॉकेट्स वातावरणापेक्षा अवकाशात अधिक कार्यक्षमतेने कार्य करतात.

                                               

साम्राज्य

साम्राज्य हा शब्द एखाद्या सम्राट अथवा बलाढ्य सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्राचा उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. साम्राज्य प्रस्थापित करणे ह्याला साम्राज्यवाद असे संबोधले जाते. जगाच्या इतिहासात रोमन साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, फ्रेंच साम्राज्य, रशियन साम्राज्य इत्यादी साम्राज्यांनी जगामधील मोठ्या भूभागावर अनेक दशके राज्य केले होते. भारतीय उपखंडामध्ये मौर्य साम्राज्य, मुघल साम्राज्य, मराठा साम्राज्य ह्या साम्राज्यांचे प्राबल्य होते. साम्राज्य साधारणपणे आकाराने राजतंत्रापेक्षा मोठे व बलाढ्य असते. इतिहासामध्ये अनेकदा काही राजतंत्रांनी एकत्र येऊन साम्राज्याची स्थापना केल्याचे देखील आढळते. उदा: ...

                                               

अस्तेक तिहेरी मित्रराष्ट्र

टेनोच्टिट्लान, टेक्सकोको आणि ट्लाकोपान ह्या तीन अझ्टेक नगरराज्यामधील संधीस अझ्टेक तिहेरी मित्रराष्ट्र म्हटले जाते. अझ्टेक तिहेरी मित्रराष्ट्र अझ्टेक साम्राज्य ह्या नावानेही ओळखले जाते. ह्या अझ्टेक नगरराज्यांनी मेक्सिकोच्या दरीभोवती १४२८ पासून १५२१ पर्यंत एर्नान कोर्तेझच्या नेतृत्वाखाली स्पॅनिश कॉंकुसिडोर आणि त्यांचे स्थानिक मित्रराष्ट्रांकडून नष्ट होइपर्यंत राज्य केले. टेनोच्टिट्लानचा इट्झाकोआट्ल, टेक्सकोकोचा नेट्झावालकोजोट्ल, आणि ट्लकोपानचे छोटे नगरराज्य ह्याच्यात १४२८ मध्ये संधी होऊन अझ्टेक तिहेरी मित्रराष्ट्र जन्माला आले. टेनोच्टिट्लान हे मोठे, महत्त्वाचे भागीदार नगरराज्य होते, आणि ट्ला ...

                                               

इंका साम्राज्य

इन्का साम्राज्य हे लॅटिन अमेरिकेतील एक ऐतिहासिक साम्राज्य होते. आजच्या पेरू देशातील कुस्को ही इन्का साम्राज्याची राजधानी होती. इ.स. १४३८ ते १५३३ दरम्यान इन्का ह्या दक्षिण अमेरिकेतील जमातीने दक्षिण अमेरिका खंडातील पश्चिमेकडील बऱ्याचशा भागावर आपले वर्चस्व स्थापन केले होते. १५२६ साली स्पॅनिश खलाशी ह्या भागात पोचले व त्यानंतरच्या काही वर्षांत इन्का साम्राज्याचा अस्त झाला आजही माक्सू पिक्त्सू येथे इन्का साम्राज्याचे भग्न अवशेष पाहायला मिळतात. या साम्राज्याची अधिकृत भाषा क्वेचुआ होती परंतु शेकडो क्वेचुआच्या अपभ्रंशित भाषा येथे बोलल्या जात असत. इंका त्यांच्या साम्राज्याचा उल्लेख तावान्तिन्सुयु म् ...

                                               

ओस्मानी साम्राज्य

ओस्मानी साम्राज्य ; आधुनिक तुर्की: Osmanlı İmparatorluğu किंवा Osmanlı Devleti ; मराठीतील चुकीचे प्रचलित नाव: ऑटोमन साम्राज्य) हे इ.स. १२९९ ते इ.स. १९२३ सालापर्यंत अस्तित्त्वात असलेले जगातील एक शक्तिशाली साम्राज्य होते. इ.स. १९२३ साली ओस्मानी साम्राज्याचा शेवट झाला व तुर्कस्तान ह्या देशाची स्थापना झाली. १६ व्या व १७ व्या शतकादरम्यान उत्कर्षाच्या शिखरावर असताना ओस्मानी साम्राज्य आग्नेय युरोप, पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिका ह्या ३ खंडांमध्ये पसरले होते. उस्मान पहिला हा ओस्मानी साम्राज्याचा पहिला १२९९ - १३२६ तर मेहमेद सहावा हा शेवटचा १९१८ - १९२२ सुलतान होता.

                                               

ख्मेर साम्राज्य

ख्मेर साम्राज्य हे इ.स. ८०२ - इ.स. १४३१ दरम्यान आग्नेय आशियात असलेले एक साम्राज्य होते. आजच्या कंबोडिया व जवळच्या भूप्रदेशावर त्याचा विस्तार होता. यावर ख्मेर राजवंशातील राजांनी राज्य केले.

                                               

गुप्त साम्राज्य

गुप्त साम्राज्य हे भारताच्या उत्तरेकडील मोठ्या भूभागावर इसवी सनाच्या तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत होते. गुप्त राज्याची स्थापना श्रीगुप्त याने केली व दोन पिढ्यानंतरच म्हणजे पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात गुप्त राज्याचे साम्राज्य झाले. गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ होता, असे इतिहासकार मानतात. या काळात भारताने कला, साहित्य व विज्ञानात खूप मोठी मजल मारली. या गुप्त साम्राज्याचा कार्यकाळ इ.स. २४० ते इ.स. ५५० पर्यंत मानला जातो. गुप्तांच्या साम्राज्याचा इतिहास छोट्या राज्यातून बलाढ्य साम्राज्यात रुपांतरीत झालेला आहे श्रीगुप्त हा गुप्त वंशाचा संस्थापक होता त्याच्या नावामागे महा ...

                                               

जपानी साम्राज्य

जपानी साम्राज्य हे इ.स. १८६८ ते इ.स. १९४७ या कालखंडात अस्तित्वात असलेले, वर्तमान जपान देशाचे पूर्ववर्ती साम्राज्य होते. ३ जानेवारी, इ.स. १८६८ रोजी मेइजी पुनर्स्थापनेनंतर हे साम्राज्य उदय पावले व दुसर्‍या महायुद्धात पराभव झाल्यानंतर ३ मे, इ.स. १९४७ रोजी या साम्राज्याचा अस्त झाला. जपानी साम्राज्याने फुकोकु क्योहेई जपानी: 富国強兵 ; अर्थ: देश श्रीमंत करा! सैन्याची ताकद वाढवा! या प्रकल्पांतर्गत देशाचे सैनिकीकरण व औद्योगीकरण आरंभले. यामुळे जपानी साम्राज्य जागतिक शक्ती बनले. जपानी साम्राज्यकाळादरम्यान ह्या देशाने झपाट्याने प्रगती केली व तो जगातील एक प्रगत देश बनला. साम्राज्यवाढीने झपाटलेल्या जपा ...

                                               

जर्मन वसाहती साम्राज्य

जर्मन साम्राज्याच्या वसाहतींना जर्मन वसाहती साम्राज्य म्हणत. हे साम्राज्य अल्पजिवी होते. १८८४ साली या साम्राज्याचा उदय झाला. परंतू जर्मनीच्या आफ्रिकेतील व पॅसिफिकमधील वसाहती पहिले महायुद्ध सुरु झाल्यानंतर काही महिन्यातच दोस्त राष्ट्रांच्या ताब्यात गेल्या. १० जानेवारी १९२० रोजी व्हर्सायचा तह झाल्यानंतर जर्मन वसाहती साम्राज्याचा अधिकृतपणे अस्त झाला.

                                               

पवित्र रोमन साम्राज्य

पवित्र रोमन साम्राज्य हे मध्य युरोपमधील राज्य/देशांना एकत्रित केलेले राष्ट्र होते. त्याची रचना इ.स. ८४३मध्ये त्यावेळच्या फ्रॅंकिश साम्राज्याचा पूर्वेकडील भागातून व्हर्दुनच्या तहात झाली. या साम्राज्यात आत्ताच्या जर्मनीचा बराचसा भाग, चेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रिया, लिच्टेन्स्टेन, स्लोव्हेनिया, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, पोलंडचा बराचसा भाग व नेदरलँड्सचा काही भाग यांचा समावेश होता. काही काळासाठी यात स्वित्झरलंड, सगळे नेदरलँड्स आणि फ्रांस व इटलीचेही काही भाग समाविष्ट होते. याच्या राज्यकर्त्यांना पवित्र रोमन सम्राट ही पदवी होती. जवळजवळ १,००० वर्षांच्या अस्तित्त्वानंतर इ.स. १८०६मध्ये याचे विभाजन झाले. अठ ...

                                               

फ्रान्सचे पहिले साम्राज्य

फ्रान्सचे साम्राज्य फ्रान्सचे मोठे साम्राज्य, फ्रान्सचे पहिले साम्राज्य किंवा नेपोलियनिक साम्राज्य या नावांनीही ओळखले जाणारे नेपोलियन बोनापार्टचे हे साम्राज्य होते. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील ही एक मोठी शक्ती होती. डिसेंबर २, १८०४ रोजी नेपोलियन सम्राट झाला. त्याने ऑस्ट्रिया, प्रशिया, रशिया, पोर्तुगाल व मित्रराष्ट्रे यांविरुद्धचे तिसर्‍या संघाचे युद्ध जिंकले. ऑस्टर्लिट्झची लढाई १८०५ व फ्रीडलॅंडची लढाई १८०७ ही त्याची युद्धे उल्लेखनीय आहेत. दोन वर्षांचा युरोपातील रक्तपात तिल्सितच्या तहामुळे जुलै १८०७ रोजी संपुष्टात आला. नेपोलियनने लढलेली युद्धे एकत्रितपणे नेपोलियोनिक युद्धे म्हणून ...

                                               

फ्रेंच वसाहती साम्राज्य

फ्रेंच वसाहती साम्राज्य म्हणजे १७व्या शतकापासून ते १९६० च्या दशकापर्यंतच्या फ्रान्सच्या अधिपत्याखालील प्रदेश. १९व्या व २०व्या शतकात हे साम्राज्य क्षेत्रफळानुसार ब्रिटिश साम्राज्यानंतरचे दुसरे साम्राज्य होते. १९२० ते १९३० या काळात या साम्राज्याने १२,३४७,००० चौ.किमी. क्षेत्र व्यापले होते. यामुळेच फ्रेंच भाषा जगभर बोलली जाते.

                                               

बायझेंटाईन साम्राज्य

बायझेंटाईन साम्राज्य हे भूमध्य समुद्र व नजीकच्या भूप्रदेशावर पसरलेले मध्ययुगातील ग्रीक भाषक-बहुल साम्राज्य होते. सम्राट कॉन्स्टंटाइनाने रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथून कॉन्स्टॅंटिनोपल येथे हलवल्यानंतर ग्रीस हे रोमन साम्राज्याचे केंद्र झाले. पुढे रोमन साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर पूर्व रोमन साम्राज्य हे बायझेंटाईन साम्राज्य म्हणून ओळखू जाऊ लागले. याची राजभाषा ग्रीक होती. याच काळात बायबलाची रचना झाली व ख्रिश्चन धर्म हा बायझेंटाईन साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला. बायझेंटाईन राज्य हे आफ्रिका, मध्य युरोप, पर्शियापर्यंत पसरले होते. अनेक प्रांत या साम्राज्यात असले तरी या साम्राज्याची ख्रिश्चन ...

                                               

मजापहित

मजापहित हे इंडोनेशिया येथील इ.स. १२९३ ते इ.स. १५०० या कालावधीत होऊन गेलेले एक हिंदू राजघराणे व साम्राज्य होते. इ.स. १३५० ते इ.स. १३८९ या काळातील हायाम वुरुक सम्राटाची कारकीर्द मजापहित साम्राज्याचा परमोत्कर्षाचा काळ होता. हायाम वुरुकाने आपला अमात्य गजा मद याच्या साथीने साम्राज्याचा विस्तार व विकास साधला. या काळात मजापहित साम्राज्याची व्याप्ती वर्तमान इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, ब्रुनेई, दक्षिण थायलंड, फिलिपाइन्स व पूर्व तिमोर एवढ्या विस्तीर्ण भूभागावर पसरली. मात्र इ.स.च्या १६ व्या शतकाच्या आरंभी या साम्राज्याची पडझड झाली. तेथील बहुसंख्य लोकांना बाली बेटावर आश्रय घ्यावा लागला.

                                               

मुघल साम्राज्य

. मोगल साम्राज्य फारसी: شاهان مغول हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले दक्षिण आशियामधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली. पुढे बाबराने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायुनने शेरशाह सूर बरोबरच्या लढाईत गमावले.पुढे हुमायुनला १४ वर्षाच्या वनवासात रहावे लागले. नंतर पानिपतच्या लढाईत त्याने ते परत मिळवले.नंतर त्याचा मुलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला. इ. स. १७०० च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मोगल साम्राज्य पूर्वेला बांग्लादेश ते पश्चिमेला बलुचिस्तान, उत्तरेला काश्मीर ते दक्षिणेला कावेरी खोऱ्यापर्यंत पसरले होते. १७०७ मधे औरंगजेबाच्या ...

                                               

मौर्य साम्राज्य

मौर्य साम्राज्य हे प्राचीन जगाच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य असून भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य वंशाने शासन केलेल्या साम्राज्याचा कालखंड इ.स.पू. ३२१ ते इ.स.पू. १८५ इतका समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक तर सम्राट अशोक हे या साम्राज्यातील सर्वात प्रमुख शासक होते. गंगेच्या खोऱ्यामधील मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र ही होती. हे साम्राज्य इ.स.पू. ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने नंद घराण्याला पराभूत करुन स्थापन केले. त्याने त्याकाळच्या भारतातील सत्तांच्या विसंवादाचा फायदा उठवून आपल्या साम्राज्याचा पश्चिमेकडे ...

                                               

रशियन साम्राज्य

रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील झारशाही नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोव्हियेत संघाचा उदय झाला.

                                               

वाकाटक

वाकाटक हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य आणि समृद्ध साम्राज्य होते. हे वंशाने चंद्रवंंशी यादव होते. इ.स. २५० ते सुमारे ५०० या काळात त्यांनी विदर्भ आणि त्या लगतच्या परिसरावर राज्य केले. या काळात त्यांची सत्ता साधारणपणे, दक्षिणोत्तर नर्मदानदीपासून तुंगभद्रानदीपर्यंत आणि पूर्व-पश्चिम, अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होती. या राजवंशच्या कार्यकाळात त्यांतील राजांनी संस्कृत आणि प्राकृत कवींना उदार आश्रय दिलेला दिसतो. होणाऱ्या वाङ्मयनिर्मितीत वैदर्भी आणि वच्छोमी पद्धतींना प्राध्यान्य दिलेले आढळते. या राजांच्या मांडलिकांनी आणि अमात्यांनी शिल्पकलेच्या निर्मितीलाही उत्तेजन दिल्याचे आढळते. याची ...

                                               

शिलाहार वंश

शिलाहार हे राष्ट्रकूट कालखंडातील उत्तर आणि दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र या भागांतील राजघराणे होते. इ.स. ९ वे ते १३ वे शतक, म्हणजे चार शतके त्यांनी राज्य केले. शिलाहार राजे तगरपूरवराधीश्वर असे बिरूद लावीत.

                                               

श्रीविजय साम्राज्य

श्रीविजय साम्राज्य हे इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील एक प्राचीन व बलशाली मलय साम्राज्य होते. अंदाजे सातव्या शतकापासून ते १३व्या शतकापर्यंत अस्तित्वात असलेल्या ह्या हिंदू साम्राज्याचा इतिहासात संलग्न उल्लेख नाही. अस्तानंतर १९२० सालापर्यंत श्रीविजयबद्दल स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय इतिहासकारांना जवळजवळ काहीही माहिती नव्हती. १९२० साली एका फ्रेंच पंडिताने श्रीविजयच्या अस्तित्वाचे पुरावे शोधून काढले. सुमारे दहाव्या शतकादरम्यान भरभराटीच्या शिखरावर असताना श्रीविजय साम्राज्याची सत्ता आग्नेय आशियाच्या सुमात्रा, मलाय द्वीपकल्प, बोर्नियो, जावा व सुलावेसी ह्या भागावर होती.

                                               

स्पॅनिश साम्राज्य

स्पॅनिश साम्राज्य हे इतिहासातील स्पेन व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या युरोप, आफ्रिका, अमेरिका व ओशनिया खंडांमधील अनेक वसाहती व भूभाग ह्यांपासून बनले होते. शोध युगादरम्यान स्थापन झालेले व एके काळी जगात सर्वात बलशाली असलेले स्पॅनिश साम्राज्य इतिहासातील प्रथम जागतिक साम्राज्यांपैकी एक मानले जाते. ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावल्यानंतर स्पेनने तेथे व कॅरिबियनमधील अनेक बेटांवर वसाहती स्थापन केल्या. तसेच आफ्रिका खंडामधील अनेक भूभाग व आग्नेय आशियामधील स्पॅनिश ईस्ट इंडिजवर स्पेनची सत्ता होती. ह्या शिवाय पश्चिम युरोपातील मोठा भूभाग स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.

                                               

वसाहती साम्राज्य

वसाहती साम्राज्ये शोध युगामुळे तयार झाली. हेन्री द नेवीगेटर याच्या अधिपत्याखाली पोर्तुगालने स्वतःचे साम्राज्य व पहिले जागतिक व्यापार जाळे अस्तित्वात आणले.

अलोइत घराणे
                                               

अलोइत घराणे

अलोइत घराणे तथा अलावित घराणे हे सध्या मोरोक्कोवर राज्य करणारे राजघराणे आहे. अलोइत या नावाची निर्मिती अली या शब्दापासून झाली आहे. अलोइत घराणे मोहम्मद पैगंबर यांचे जावई अली इब्न अबी तालिबचे वंशज आहेत. सध्या पाचवा मोहम्मद हा या वंशाचा राजा आहे.

इटालियन वसाहती साम्राज्य
                                               

इटालियन वसाहती साम्राज्य

इटालियन वसाहती साम्राज्य किंवा इटालियन साम्राज्य म्हणजे इटलीच्या वसाहती. या सर्व वसाहती आफ्रिकेत होत्या. १८६१ साली इटलीचे एकत्रीकरण झाले. १८६१ पर्यंत स्पेन, पोर्तुगाल, ब्रिटन, नेदरलँड्स व फ्रान्स या राष्ट्रांनी जगभर स्वतःच्या वसाहती स्थापल्या होत्या. त्यामुळे आफ्रिकेतील उर्वरित विभाग इटलीने आपल्या अधिपत्याखाली आणले.

उमायद खिलाफत
                                               

उमायद खिलाफत

उमायद खिलाफत ही मध्यपूर्वेतील खिलाफत होती. हिची स्थापना इ.स. १६६१मध्ये मुआविया इब्न अबी सुफियानने केली. या खिलाफतीचे सत्तास्थान सीरियाच्या दमास्कस शहरात होते. मुआविया हा मूळ मक्केचा असून सीरियाचा राज्यकर्ता होता. त्याच्यानंतर उस्मान इब्न अफ्फान याने खिलाफतीचा विस्तार केला.

ऑस्ट्रियन साम्राज्य
                                               

ऑस्ट्रियन साम्राज्य

ऑस्ट्रियन साम्राज्य हे एक अर्वाचीन साम्राज्य होते. हे साम्राज्य इ.स. १८०४ ते इ.स. १८६७ या काळात अस्तित्वात होते. हे साम्राज्य नंतर हंगेरीबरोबर एकत्र झाले व ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याची स्थापना झाली. पहिल्या महायुद्धानंतर हे देश पुन्हा वेगळे झाले.

ऑस्ट्रिया-हंगेरी
                                               

ऑस्ट्रिया-हंगेरी

ऑस्ट्रिया-हंगेरी हे मध्य युरोपातील एक दुहेरी राजतंत्र होते. १८६७ साली ऑस्ट्रिया व हंगेरीच्या नरेशांनी ह्या संयुक्त देशाची स्थापना केली. ५१ वर्षांनंतर पहिल्या महायुद्धानंतर ह्या देशाचे विघटन करण्यात आले.

कदम्ब
                                               

कदम्ब

कदम्ब राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता. यांचे राज्य हे उत्तर कर्नाटक आणि कोकण या भागात होते. कदम्ब राजा काकुत्सवर्मा याच्या काळात आताच्या कर्नाटक राज्याचा बहुतांश भाग त्यांनी व्यापला होता. त्यांची राजधानी आताच्या कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील बनवासी ही होती.

कुशाचे राज्य
                                               

कुशाचे राज्य

कुशाचे राज्य हे एक प्राचीन न्यूबियन राज्य होते. ते सध्याच्या सुदानच्या प्रदेशात होते. त्यांचा राजा कश्त याने इजिप्त जिंकून घेतल्यावर कुश राजे ख्रिस्तपूर्व ६५६ पर्यंत इजिप्तचे पंचवीसावे फॅरो होते.

कोर्दोबाची खिलाफत
                                               

कोर्दोबाची खिलाफत

कोर्दोबाची खिलाफत हे दहाव्या शतकातील पश्चिम युरोपाच्या आयबेरियन द्वीपकल्पावरील अल-आंदालुस ह्या मुस्लिम भूभागाचे एक राज्य होते. कोर्दोबा येथे राजधानी असलेली ही खिलाफत इ.स. ९२९ ते इ.स. १०३१ दरम्यान अस्तित्वात होती. अब्द-अर-रहमान तिसरा ह्याच्या राजवटीखालील ही खिलाफत प्रगत व सुबत्त होती.

गुलाम घराणे
                                               

गुलाम घराणे

गुलाम घराणे हे दिल्ली सल्तनतीतील पहिले महत्त्वाचे घराणे होय. मोहम्मद घौरीच्या मृत्युनंतर त्याचा वजीर कुतुबुद्दीन ऐबक याच्यापासून दिल्लीवर गुलाम घराण्याची राजवट सुरु झाली. या घराण्याची सत्ता १२०६ ते १२९० पर्यंत होती. घौरीच्या गुलामांनी राज्य केल्याने त्यांना राजघराण्या ऐवजी गुलाम घराणे म्हणतात.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →